Home बातम्या विकास मित्रांचा अभ्यास दौरा

विकास मित्रांचा अभ्यास दौरा

2

मित्र मित्र मिळून सहलीला जाणे यात काही नवीन नाही. मात्र काही विकासाभिमुख मित्रांनी एकत्र येऊन नुकताच स्वखर्चाने एक अभ्यास दौरा केला.
या दौऱ्यात या मित्रांनी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार या विकास तीर्थांना भेटी देऊन, पाहणी, चर्चा करून सर्व माहिती घेतली.

निवृत्त पोलिस महासंचालक (सी आय डी) श्री दत्तात्रय मंडलीक, मंत्रालय सहकारी बँकेचे संचालक श्री सुनिल खाडे, श्री उद्योजक श्री रणजीत गोडमगावे, उद्योजक शास्त्रज्ञ श्री संतोषजी ढाकणे, श्री ऊमेश ऊगलमोगले या मित्रांनी, राळेगण सिद्धी येथील विकास कामांची, उपक्रमांची प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी विविध बाबींवर सखोल चर्चा झाली.

राळेगण सिद्धीचे सरपंच, श्री औटी तसेच अण्णांचे स्वीय सहायक संदीप पाठारे व शामराव पाठाडे हे ही यावेळी ऊपस्थित होते.

या चमूने राळेगण सिद्धी माहिती केंन्द्र तसेच शाळा वस्तीगृह व गावात राबविण्यात येत असलेले इतर प्रकल्प यांनाही भेटी दिल्या.

यावेळी रुद्राक्ष व बारमाही येणारे आंबे, सफरचंद फणस व फुलझाडे आदी विविध वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांची विविध विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन केले.

हिवरे बाजार भेट
हिवरे बाजारचे आदर्श सरपंच, पद्मश्री पोपटराव पवार यांचीही या चमूने भेट घेतली. त्यांच्याशीही सविस्तर चर्चा करून गावातील विविध विकास कामांची माहिती घेण्यात आली. या अभ्यास दौऱ्याने या विकास मित्राना आपापल्या परिसराच्या विकासासाठी नक्की काय करता येईल, याची प्रेरणा मिळाली असेल, हे नक्कीच. या अभिनव दौऱ्यानिमित्त या सर्व मित्रांचे मनःपूर्वक अभिनंदन.

– देवेंद्र भुजबळ 9869484800

2 COMMENTS

  1. नमस्कार मित्रांनो,

    “विकास मित्रांचा अभ्यास दौरा” ही संकल्पना घेऊन विविध वयोगटातील आणि क्षेत्रात काम करणाऱ्या पांच मित्रांनी एकत्र मिळून आपल्या राज्यात अनेक कारणांमुळे प्रसिद्धीस आलेली अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या दोन गावातील कर्ममहर्षि अण्णा हजारे व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या परिसरातील अनेक सामाजिक वनीकरण व इतर विकास कामांचा आढावा घेऊन अशी विकास कामे आपल्या गाव परिसरात आपल्याला करता येईल काय? असा मनोदय घेऊन अशा विकसीत कामांचा अभ्यास दौरा आयोजित करणे ही नक्कीच प्रेरणादायी गोष्ट आहे. त्यामुळे समाजातील अनेक तरुणांना व कार्यकर्त्यांना अशा अभ्यास दौ-यांचे आयोजित करण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात ज्या पांच विकास मित्रांनी हा अभ्यास दौरा काढल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या भविष्यातील चांगल्या उपक्रमासाठी शुभेच्छा !!

    शुभेच्छूक,

    राजाराम जाधव,
    उलवे, नवी मुंबई,

  2. विकास मित्रांचा अभ्यास दौरा या शीर्षकाखाली सर्व विकास व विकासाभिमुख मित्रांनी एकत्र येऊन नुकताच स्वखर्चाने अभ्यास दौरा केला सदर दौऱ्यात अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार विकास तीर्थांना भेटी दिल्या याचा आनंद वाटतो आहे. आपापल्या परिसराच्या विकासासाठी नक्की काय करता येईल याची सर्वांना प्रेरणा मिळाली आहे हाच सर्वांचा फायदा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version