Home साहित्य विवेकी मना !!

विवेकी मना !!

1

ह्या उतावळ्या मनाला
काही कळतच नाही.

प्रत्येक वयाबरोबर हे मन
शरीरात राहायला स्मरतच नाही.

विवेक विवेक करत ही बुद्धी
शरीर मनाला तयार करत नाही

मनाला आहे बुद्धीची जोड
शरीराला आहे तारुण्याची ओढ

विशी तिशीच्या चैतन्यासारखे
हे मन वेगे वेगे धावते
शरीराला सतत प्रेरणेतून
विवेकानी पुढे पुढे करते

चाळीशी पन्नाशीला विश्वासानी
हे मन ‘मी परिपूर्ण’ म्हणते
प्रत्येक पेशीला गालात हसून
विवेक ‘चूबंकिय’ तत्वात जोडते

ह्या मनाने ‘आनंदा’ची किल्ली
ब्रह्मविद्येच्या हातून घेतली काय

विवेक बुद्धी स्पंदा स्पंदाने
फुलून खुलू लागली छान

आता ‘यौवना’ने भरलेले हे शरीर
‘मी तरुण’ ‘मी तरूण’ स्वतःला
‘शुद्ध’ मनाने जोडू लागले.

मग हे विवेकी मन ‘स्वाभाविक’पणे
बूद्धीला ठासून ‘मी ठणठणीत’ म्हणत
अंतचक्षूनी स्वतःला पाहू लागले

आणि आता हे समाधानी मन
‘ऊत्साहा’ने ‘संतोषा’ने शरीरात
‘स्वर्गीय आनंदाने सुखी होऊ लागले.

मनाने बुद्धीला जिंकले
बुद्धीने मनाला जिंकले

मन आणि बुद्धी
नांदू लागले, रमू लागले
हातात हात घालून राहू लागले
हातात हात घालून फिरू लागले.

पूर्णिमा शेंडे.

— रचना : सौ.पूर्णिमा शेंडे.
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version