Home साहित्य विषम अक्षर

विषम अक्षर

0

उच्चार त्यांचे सारखे,
पहिले अक्षर पारखे

एक शस्त्र, दुसरे वस्त्र,
गुणांनी मात्र विचित्र

हृदयी छेद शस्त्राने,
जखम बांधू वस्त्राने।

तनी-मनी लचके शस्त्राचे,
लाज-शृंगार करू वस्त्राचे।

शरीर विटंबना शस्त्राने,
शालीन मूर्ती सजवू वस्त्राने

क्रूर भीती शस्त्राची,
मायाळू शाल पांघरू वस्त्राची

तनी घाव शस्त्राने,
रक्त थोपवू वस्त्राने।

प्राण ज्योत मावळे शस्त्राने,
चिरनिद्रित तनी झाकू वस्त्राने

राग प्रतिक, ते शस्त्र,
शांती द्योतक, ते वस्त्र

वर्षा भाबल.

रचना – सौ.वर्षा महेंद्र भाबल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version