Home साहित्य प्राणांचे झुंबर…

प्राणांचे झुंबर…

0

तुझ्या काळजाशी
प्राण हा दंगला.
तुझ्या पापणीत
अश्रू अडकला.

प्राणांचे झुंबर
असे अडकले.
जीव बावरला
श्वास गंधाळले.

तुझा तू माझी मी
न राहिले अता.
मूक झाले शब्द
सांज सांजावता.

पापणीस आता
भेटीची ही आस
सोबतीने सुरू
जन्माचा प्रवास.

धरलेला हात
जन्माचे गणित
फेऱ्यात ह्या जुळे
सुखाचे गुपीत.

अनुपमा मुंजे

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version