Home बातम्या “शिल्पा सन्मानित”

“शिल्पा सन्मानित”

0

आपल्या पोर्टलच्या नियमित लेखिका- कवयित्री तथा “मी शिल्पा, चंद्रपूर ते केमन आयलंड” या न्यूज स्टोरी टुडे ने प्रकाशित केलेल्या प्रेरणादायी आत्मचरित्राच्या लेखिका शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांना नुकतेच नागपूर येथे ‘हिरकणी पुरस्काराने गौरविण्यात आले.

अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरात ‘स्त्री शक्ती जागृती मेळावा’ आणि ‘हिरकणी पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात पार पडला. अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस या संस्थांनी सामाजिक, साहित्यिक, वैद्यकीय, न्याय आणि सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला. महिलांच्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला विचारपीठ मिळवून देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड व थिऑसाॅफीकल आर्डर ऑफ सर्व्हिसच्या अध्यक्षा व आयोजिका डॉ.स्मिता मेहेत्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या. उद्घाटक नागपूरच्या महापौर नीताताई ठाकरे, सहउद्घाटक उपमहापौर लीलाताई हाथीबेड प्रमुख अतिथी, अनिता पांडव , डॉ.नीलम जैन, सरीता राणेकर, श्रध्दा ढोमणे, रिता चंद्रीकापुरे व अंजली पोटुवार यांना स्त्री-शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. आलेल्या ६५७ प्रस्तावातून ३३ हिरकणींची निवड करण्यात आली, त्यापैकी शिल्पा एक असून बाकीच्या हिरकणी, पुढील प्रमाणे आहेत.
तेजस्विनी नागोसे – मूल जि. चंद्रपूर ,डाॅ. लीना निकम- नागपूर , डॉ.श्वेता मानवटकर- बल्लारपूर जि.चंद्रपूर, प्रा.डाॅ. सौ.माधुरी वाघ -नागपूर , उज्वला नगराळे -चंद्रपूर ,नंदा सोनुले- नागपूर, संध्या भांगरे- नाशिक, डॉ. मोनाली पोफरे- नागपूर, ज्योती बन्सोड- बेलोना त. नरखेड जि.नागपूर, प्रा.डाॅ. सुकेशनी बोरकर- नागपूर,उषा घोडेस्वार – भंडारा, ज्योती कावरे -एन. एम. सी. नागपूर , प्रा.डाॅ.सायली सारडे -नागपूर , उषा ढोके – पिंपळगाव (भोसले) ब्रह्मपुरी,रेखा सोनारे -नागपूर, शालिनी अनिता चांदेकर -चंद्रपूर, डॉ.ऋतुजा गोमासे -नागपूर, शारदा गणोरकर -परतवाडा जिल्हा अमरावती, सोनल माहेश्वरी – नागपूर, स्नेहल मदनकर – यवतमाळ , ज्योती कोहळे – नागपूर ,पल्लवी कांबळे – यवतमाळ, आरती झोटिंग – नागपूर, योगिता गवळी – बीड, प्रा. डॉ.पद्मिनी चंद्रशेखर दुरुगकर -नागपूर , हेमलता वैद्य -यवतमाळ, अनुराधा मारचट्टीवार – हैदराबाद ,मंदा खंडारे -नागपूर, वसुधा येनकर – नागपूर ,प्रतिभा सहारे – नागपूर, प्रा. कल्पना मुंगले- ता.देवळी जि.वर्धा यांना शाॅल, हिरकणी पुरस्कार, सन्मानचिन्ह, रोप, विचार पुष्प, मानपत्र व इतर भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने महिलांच्या कलागुणांना आणि सामाजिक कार्याला नवी उभारी मिळाली असून, सावित्रीच्या लेकींनी आपल्या कर्तृत्वाने हा सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी केला. या मेळाव्यात महिला सक्षमीकरण आणि समाज प्रबोधनावर भर देण्यात आला.

याप्रसंगी प्रणोती कळमकर लिखित “चैतन्यस्मृतींचा सौंदर्यबोध” या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. विविध स्पर्धेत यशस्वी होणाऱ्यांना सन्मानचिन्ह, भेटवस्तू देण्यात आल्या.

प्रबोधिनी स्टार चे पत्रकार व संचालक प्रशांत रामटेके यांचा शाॅल, श्रीफळ, विचार पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रणोती कळमकर, निमा बोडखे, शितल बनसोड, मंजुषा चरडे यांनी केले.

प्रास्ताविक उज्वला पाटील, मनोगत विद्या सुरकार, रेखा हिरूडकर, उज्वला पाटील, डॉ. शिल बागडे, स्वागत गीत संजीवनी हलमारे, ज्योती बनकर, मिशन सिंदूर नृत्य नंदा सोनुले व समुह यांनी सादर केले.

आभारप्रदर्शन छाया महाले यांनी केले. निशिकांत मेहेत्रे, ॲड. रविंद्र सुपारे, ॲड.रोमा खंडवाणी ,सुनंदा जांबुतकर, संगीता लंगडे, सुनंदा सुपारे, विभावरी बांडबुचे, शोभा येवले, जयश्री मोहितकर, जयश्री भाजीपाले, वैष्णवी राणेकर, मंगला ठाकरे, वंदना क्षिरसागर, राणी शहा, सिंधू कांडलकर, डॉ .श्रद्धा बेले, राकेश चाटाले आदींनी सहकार्य केले.

यावेळी शहरातील विविध मान्यवर आणि बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

— टीम एनएसटी. ☎️+91986944800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version