Home साहित्य श्रावणमास

श्रावणमास

1

निसर्गाचे बदलते
चक्र आणि परंपरा
चातुर्मासी श्रेष्ठ मास
मोद घडवी भूधरा

अमावस्ये दीप पूजा
मांसाहार वर्ज करा
व्रत वैकल्याची धूरा
वर्षा येई झरझरा

पाठशिवणीच्या खेळा
सप्तरंगाचे दर्शन
इंद्रधनू निरखता
चैतन्याने रंगे मन

आनंदोत्सवाने सुरू
शिवामूठ जव तीळ
क्रमशीर पिंडीवर
दुग्ध धरा घाली शीळ

मंगळागौरीच्या व्रता
पूजा उखाणे घालून
जागरण वेशभूषा
येती ललना नटून

नागोबाच्या पूजनाने
झिम्मा फुगडी खेळती
कृषकाला प्रार्थनेने
संरक्षणा आळवती

शुक्ल पक्षी पुनवेला
सागरास ते‌ अर्पती
नारळास कोळी बंधू
साम गायन करती

सागराच्या खजिन्याला
होडी हेलकावे मारी
भरू द्यावी रत्नाकरा
धन धान्ये ललकारी

शोभा कोठावदे

— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version