Home बातम्या “संवादभूषण”ने झाल्या खा. प्रा डॉ ज्योती वाघमारे प्रभावित

“संवादभूषण”ने झाल्या खा. प्रा डॉ ज्योती वाघमारे प्रभावित

0

देवेंद्र भुजबळ लिखित, ग्रंथाली निर्मित, न्यूज स्टोरी टुडे प्रकाशित, “संवादभूषण” पुस्तकातील एक कथा नायिका, सोलापूर येथील सौ कांचन देशभूषण कंदले ह्यानी नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य तथा खासदार प्रा. डॉ.ज्योती वाघमारे यांना त्यांच्या सोलापूर दौऱ्यात नुकतेच संवादभूषण पुस्तक भेट दिली.

यावेळी सौ कांचन देशभूषण कंदले ह्यानी पुस्तकाची माहिती देत असताना, खा. प्रा. डॉ.ज्योती वाघमारे यांनी पुस्तकाचे लेखक कोण आहे ? आणि त्यांची (कांचन ह्यांची) जीवन कथा पुस्तकात किती नंबर वर आहे ? हे आवर्जून विचारले आणि पुस्तकात पान नंबर 154 वर असलेली त्यांची जीवन कथा वाचून अभिनंदन करून या पुढेही अशाच प्रगती पथावर रहा, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी खा. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी पुस्तकातील इतरही नायक, नायिकांच्या जीवनकथावर ओझरती सर्वांचे अभिनंदन केले.

यावेळी सौ कांचन कंदले ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना खासदार डॉ.ज्योतीताई वाघमारे, यांचे आभारी मानून आज मी धन्य झाले, अशी भावना व्यक्त करून संवाद भूषण पुस्तकाचे लेखक श्री देवेंद्र भुजबळ यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी विविध मान्यवर व्यक्ती, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️+91 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version