“संवादभूषण” : साद 7
“संवादभूषण” हे श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेले, ग्रंथाली ने निर्मिती केलेले आणि न्यूज स्टोरी टुडे ने प्रकाशित केलेले पुस्तक काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले. त्याचा वृत्तांत आपण वाचला असेलच.
हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी ज्यांनी पूर्व नोंदणी केली होती, अशा व्यक्तिंना ते पाठवून देण्यात आले होते. जसजसे पुस्तक त्या त्या व्यक्तिंना मिळत गेले, तसतशा त्यांच्या मिळत गेलेल्या ऊस्फूर्त प्रतिक्रिया आपण “संवादभूषण” : साद..
अंतर्गत प्रसिद्ध करीत आलो आहोत.

आता पुस्तकाच्या प्रकाशनानंतर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
1
सप्रेम नमस्कार.
संघर्ष…. संघर्षमय वाटचाल हि प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच. याच अनुभवातुन मनुष्य शिकतो. यशस्वीतेकडे वाटचालीसाठीचे धडे घेतो. आलेल्या संकटावर मात करतो. सकारत्मकतेकडे वाटचाल करतो. अश्या धडाडीच्या निवडक व्यक्तींना शोधुन त्यांचा जीवन प्रवास आपण “संवादभूषण” पुस्तकाच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवुन अनेकांच्या आयुष्या
जेला एक चांगली दिशा देण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय, प्रेरणादायी, स्फूर्तीदायक असाच आहे. संवादभूषण मधील विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अभिनंदन. आपल्या कडून पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणा मिळतेय. देवेंद्रभाऊ. अलकाताई खुप धन्यवाद. पुदील वाटचालीसाठी शुभेच्छा.. आपला मित्र
— अनिल शाह, अहिल्यानगर .
2
दूरदर्शन कॅमेरामन, आमचे मित्र, नरसिंगजी पोतकंठी साहेब यांचे सहकारी देवेंद्र भुजबळ यांच्या संवादभूषण या पुस्तकांत ३४ शिलेदारांचा प्रवास, अनुभव, आदर, कामाविषयी आत्मियता, कुटुंबाचे भान, देश प्रेम असे सर्वांचे अनेक पैलू मांडले आहेत.यात आपल्या सोसायटीतील जेष्ठ नरसिंगजी पोतकंठी साहेब यांचा ६ वे सदरात मानाचा उल्लेख आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पोतकंठी साहेब यांचे खूप खूप अभिनंदन!
— नरसिंगजी पोतकंठी. मित्र मंडळ, मुंबई.
टीव्ही पत्रकार श्री मनोज भोयर यांची आई तन्मयतेने “संवादभूषण” वाचताना ….
3
सर,
आपले “संवादभूषण” पुस्तक नुकतेच वाचले.आपण सदर पुस्तकात 34 व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा सादर केल्या आहेत.हे पुस्तक प्रबोधनकारक आहे. त्यातून वाचकाला बरंच काही शिकता येण्यासारखं आहे.
हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे इतके सुंदर आहे. आपण बरीच पुस्तके लिहिली आहेत आणि लेखक म्हणून सुद्धा आपण स्थापित आहात तरी देखील या पुस्तकातील लिखाण पद्धत, भाषा शैली अत्यंत साधी सोपी आणि सहज आहे. पुस्तकं खूपच छान आहे. अजूनही आपल्या हातून अशी बरीचशी पुस्तके लिहिली जावोत आणि ती समाजाला मार्गदर्शक ठरो ही इच्छा आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा. धन्यवाद.
— मुनाफ पटेल. मुंबई
4
हार्दिक अभिनंदन देवेंद्र भुजबळ सर. तुमचे ११ वे पुस्तक प्रकाशित झाले ही अतिशय आनंददायक आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. तुमचे स्नेही आणि वाचक म्हणून खूप अभिमान वाटतो आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपुर
5
संवाद भूषण पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन सर.
— शुभांगी पासेबंद. ठाणे
“संवादभूषण” वाचताना ….
6
‘संवादभूषण’ साठी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा !👏🏻
— प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा.
7
मनापासून अभिनंदन.
— प्राचार्य सूर्यकांत वैद्य, पुणे.
8
अरे वा ! नवीन अकराव्या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा 👌🏻👍🏻👏🏻👏🏻🎉🎊💐
— सौ. स्नेहा मुसरिफ. पुणे
9
सन्मा श्री भुजबळ साहेब, नमस्कार.
आपल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि दूरदर्शन सेवाकाळात तसेच वृत्तपत्र क्षेत्रातील व इतर सेवेतील अनेक मान्यवरांनी भूषणावह कामगिरी बजावली आहे, अशा सर्व “संवादभूषणांची” समाजात सर्वदूर ओळख व्हावी, ही आपली मनिषा मनात ठेवून या मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन पुस्तकरूपात मांडण्याची इच्छा फलद्रूप झाली असे मला वाटते.
कारण, आपल्या सकस लेखणीच्या धारदार विचारातून “संवादभूषण” तयार होऊन त्याचे प्रकाशन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व अनेक नामवंत मंडळींच्या उपस्थितीत लोणावळा येथील प्रशस्त सभागृहात मोठ्या थाटामाटात प्रकाशन सोहळा पार पडला हा क्षण आपल्यासाठी अतिशय मोलाचा आणि आनंदाची गोष्ट आहे.आपल्या या “संवादभूषण” पुस्तकाला इतर पुस्तकाप्रमाणे सर्वदूर ख्याती मिळो हीच आमची सदिच्छा व पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा !!
आपला शुभेच्छा शुभेच्छूक,
— राजाराम जाधव. निवृत्त सहसचिव, मंत्रालय, नवी मुंबई.
उपरोक्त सर्व सुहृदांचे मनःपूर्वक आभार. आपला लोभ असाच कायम असू द्या.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800