Home बातम्या संविधान दिन : रेडिओ एफ्टीआयआय वर काव्य जागर

संविधान दिन : रेडिओ एफ्टीआयआय वर काव्य जागर

0

पुणे येथील जग प्रसिद्ध फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया च्या रेडिओ एफ् टी आय आय ९०.४ एफ् एम वाहिनीवर संविधान दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

संस्थेचे प्रमुख संचालक विश्वास नेर्लेकर, स्टेशन मॅनेजर अनुराधा वजिरे, निर्देशिका नीता तुपारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली साहित्यिक व नाट्य चित्रपट दिग्दर्शक श्री अशोक भगवंत वाघमारे यांच्या संकल्पनेतून नुकताच हा विशेष कार्यक्रम ध्वनिमुद्रित करण्यात आला. या कार्यक्रमाचे संविधान दिनी प्रसारण करण्यात आले .

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील साहित्यिकांच्या उपस्थितीने प्रथम संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून कविता सादरीकरण केले. यात डॉ जयद्रथ आखाडे, सिंहल मेंढे, अशोक सोनवणे, अरूण घोडके, दिव्या भोसले, सुनिता घोडके, सविता भोकरे कांबळे, अशोक वाघमारे यांनी अतिशय उद्बबोधक व बहारदार रचना सादर केल्या.

या कार्यक्रमाचे निवेदन डॉ जयद्रथ आखाडे यांनी करुन संपूर्ण एफ् टी आय टीमचे तसेच सर्व सहभागी साहित्यिकांचे आभार मानले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version