Home साहित्य सखी अलका

सखी अलका

1

नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टलच्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त, कवयित्री सौ शोभा कोठावदे यांनी छान काव्यमय शुभेच्छा दिल्या आहेत. त्या पुढे देत आहे.
सौ शोभा कोठावदे यांचे मनःपूर्वक आभार.
— संपादक

जन्म दिन तेजस्वितेचा
शोभते तू रणरागिणी
साऱ्या संकटांवर मात
जणू भासते सौदामिनी

मुख कमलात हास्य
आधुनिक जागवे उर्जा
नाही मनी भय कसले
देते जनमनात उर्जा

दीर्घायुष्य लाभो तुज
ईश्वर चरणी ईच्छा
अशीच उंच भरारी घे
मनापासून सदिच्छा

आशीर्वाद अन् शुभेच्छा
जणू अंबर फुलावे
स्वर्णमय दिन व्हावा
चैतन्य तुझे खुलावे

मनाचे तेज, प्रगल्भता
लेखणीतून झळाळे साहित्य
मोत्यांच्या राशी व्हाव्या
हेच मनोमनी औचित्य

शोभा कोठावदे

— रचना:सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई. 9869484800

1 COMMENT

  1. वा खूप छान कविता केली अलका मॅडम वर, अप्रतिम 👌👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version