सखे…

10

सखे,
तुझं दिसणं बघता बघता
खर बोलायचं राहून गेलं !!
घायाळ झालो तुझ्या प्रत्येक अदेवर
पण भानावर यायचं राहून गेलं !!

तुझं लाजर हास्य बघून
मनाचं पाखरू शहारून गेलं !!
नुसताच बसलो न्याहाळत तुला
अन् मन वाचायचं राहून गेलं !!

अग,
स्वप्नात तुला पाहता पाहता
 झोपेशी नात तुटून गेलं !!
तुला विसरूनही जगून पाहिलं
पणं मग खर जगायचं राहून गेलं !!

प्रेम भरलं हृदयाशी ,
मनात जपायचं राहून गेलं !!
माझं माझं म्हणताना ,
तुझं व्हायचं राहून गेलं !!

आज,
सगळेच सोहळे मनाचे झाले
तुला सांगणं मात्र राहून गेलं !!
तुझी येणारी आठवण आणि त्या श्वासाला
नाव माझं द्यायचं राहून गेलं !!

अखेरचं ऐक,
पापणी तुझी ओलावली एकदा
तेव्हा मन माझं ही झाल ओलं !!
शब्दात सांगायचे होत सार
प्रेम अबोल राहून गेलं !!

किरण सोनार

– रचना : किरण सोनार. नाशिक

10 COMMENTS

  1. सुरेख कविता.भावना आणि शब्दांचा सूंदर मेळ

  2. किरण सोनार यांची कविता वाचून मन खरोखरच हेलावून गेलं.
    पापणी तुझी ओलावली एकदा
    तेव्हां मन माझंही झालं ओलं
    तुझी येणारी आठवण आणि श्वासाला
    नांव द्यायचं राहून गेलं..

    क्या बात है!!..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version