Home साहित्य सांगा कोण कुणाचं…

सांगा कोण कुणाचं…

1

कुठे राहिली माणसांची नाती
आज सारी सारी विखुरलेली

सुखावती, श्वापदांचे कळप
सदा सदा चालती संगसंगती…..

मानव आज सुशिक्षित झाला
सुखाची, व्याख्याच बदलली

आजकाल भौतिक प्रलोभने
जीवाजीवा, सुखावु लागली…..

दृष्टांत हा कलियुगाचा आता
भोवतो, अंतराला भोवताली

प्रेम, जिव्हाळा आता संपला
जाहली, काळजाची काहिली

सांगा कोणकुणाचे उरले आहे
प्रीतभावनांच सर्वत्र लोपलेली

— रचना : वि .ग. सातपुते
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. जाहली काळजाची काहिली सुंदर कविता

    गोविंद पाटील सर जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version