साद

0

जगण्याच्या त्या दरी डोंगरातून
आशेची अवखळ सरिता पुन्हा खळाळून हसावी.

बळीराजाच्या त्या कर्जाहून कैकपटीने,
कणिसांची ती रास उरावी.

थकल्या भागल्या श्रमिकांचीही
मैफिल हृदयी कोऱ्या ती उतरावी

दिनदुबळ्या त्या हाकेला
आर्ततेची साद असावी

राब राबुनी रापलेल्या हातांना
मृदू मुलायम तीच कोवळी साथ असावी

अनुभवाच्या दगडाला ठेचाळलेल्या बोटांची
इतुकिशी हळद आपल्यात दिसावी

दारूण यातना सोशीत सोशीत अडगळीतल्या बाजेवरच्या त्या जीवाला
दिखाव्याच्या झालरीविना
आपलेपणाची ऊब असावी

स्वर्ग कुठला काय कसा तो माहित नाही
प्रत्येकाला दिशादर्शक मातापित्यातून
ईश्वराच्या स्व स्वरूपाची
नव छबी दिसावी.

रित्या मनाला त्या, गाभाऱ्यातील
सुप्त शक्तीची प्रचिती यावी.

संगीता कासार

– रचना : संगीता कासार. लातूर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version