Home सेवा सिन्नर – नासिक सिटीलिंक बससेवा दिमाखात सुरु

सिन्नर – नासिक सिटीलिंक बससेवा दिमाखात सुरु

0

ज्येष्ठ नागरिक, शाळा—महाविद्यालयाततील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकवृंद, रग्ण, सरकारी, निमसरकारी, खाजगी चाकरमानी, खेड्यापाड्यातून तालुक्यात येणारे शेतकरी, मजूरवर्ग, न्यायालय, पोलीस मुख्यालय, उपजिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक,ब. ना. सारडा , संंजिवनी व जि. प. मराठी शाळा, टपाल कार्यालय ,मार्केट यार्डात येणारे व्यापारी, शेतकरी अशा सर्वांसाठी अत्यंत उपयोगी व सोयीची असलेली नाशिक सिन्नर सिटीलिंक बससेवा मुठभर विघ्नसंतोषी महाभागांनी स्वतःच्या स्वार्थासाठी गुंडगिरी करुन बंद पाडली होती.

या सिटीलिंक बसला अडथळा निर्माण करणे, वाहक व वाहन चालकास दमदाटी करुन मारहाण करणे, धुळ उडण्याच्या व बस दुकानासमोर उभी न करण्याच्या कारणावरुन दमदाटी करणे या सर्व मानवनिर्मित अडथळ्यांवर मात करुन विजयनगर ज्येष्ठ नागरीक संघ, सौ. शितल व श्री. सुनिल कानडी यांच्या अमुल्य सहकार्याने नाशिक सिन्नर ( कानडी मळ्यापर्यंत) सिटीलिंक बससेवेचा शुभारंभ सिन्नरचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष श्री विठ्ठलराजे उगले यांच्या हस्ते नुकताच श्रीफळ वाढवून करण्यांत आला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, सिटीलिंकचे नाशिक विभागाचे प्रमुख श्री. सुरेश कातकाडे, ज्येष्ठ पत्रकार सुभाषशेठ जाजू, देशदूतचे श्री विलास पाटील,श्यामसुंदर झळके, माहिती व जनसंपर्क विभागाचे रवींद्र घोगे ( से. नि.), नगरसेवक पंकज जाधव, नगरसेविका सौ. शितल कानडी, संतोष शिंदे, राजाभाऊ घोरपडे, सुनिल कानडी, आरटीओचे राजेंद्र घोगे, सदाभाऊ निकम, रघुनाथ निकम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

नाशिक सिन्नर .. कानडीमळ्यापर्यंत सिटीलिंक बससेवा कायमस्वरुपी सुरु राहण्यासाठी सिन्नर न.पा. कडून सर्वतोपरी सहकार्य करण्यांत येईल असे आश्वासन नगराध्यक्ष श्री विठ्ठलराजे उगले यांनी यावेळी दिले. सिटीलिंकचे वाहक व वाहनचालक यांना समस्या अद्भवल्यास त्यांनी तात्काळ श्री. कातकाडे, सौ. शितल कानडी, सुनिल कानडी, राजाभाऊ घोरपडे यांचेशी तात्काळ संपर्क साधण्याच्या सुचना उपनगराध्यक्ष श्री हर्षद देशमुख यांनी संबंधितांना केल्या. प्रवाशांसाठी लवकरच सिन्नर नगर पालिका,सिटीलिंक प्रशासन व इतर माध्यमातून आवश्यक ठिकाणी बसथांबा निवारा शेड, बसथांबा फलक इत्यादी सोयी आगामी सिंहस्थ कुंभमेळा निधीतून अथवा इतर निधीतून उपलब्ध करुन देण्याची मागणी श्री रवींद्र घोगे यांनी यावेळी केली. या मागणीस उपस्थित मान्यवरांनी सहमती दर्शविली.

सिटीलिंक बस वळविण्यासाठी मैदानाची उपलब्धता व जेसीबीद्वारे सपाटीकरण सौ. शितल व सुनिल कानडी यांनी स्वखर्चाने करुन दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार श्री सुभाषशेठ जाजू श्यामसुंदर झळके व उपस्थित सर्वांनीच त्यांचे आभार मानले.

यावेळी श्री घोगे यांनी उपस्थित केलेल्या नवीन घरांचे पुर्णत्वाचे दाखले लवकर मिळण्याबाबत व नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रलंबित विषय तातडीने सोडविण्याबाबत मा. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी तातडीने लक्ष घालावे अशी विनंती केली. लवकरच या प्रलंबित विषयांबाबत बैठक आयोजित करुन निर्णय घेण्याचे आश्वासन नगराध्यक्ष श्री उगले व उपनगराध्यक्ष श्री देशमुख यांनी दिले.

याप्रसंगी सुभाष जाजू, श्यामसुंदर झळके, सौ. शितल कानडी, सुनिल कानडी सिटीलिंकचे प्रमुख श्री सुरेश कातकाडे आदींनी आपले मनोगत व्यक्त करुन या बससेवेत अडथळा आणणार्‍यांबर पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्याची मागणी केली. तसेच सर्वांनीच सहकार्य केल्यावद्दल धन्यवाद दिले.

श्री कातकाडे यांनी विजयनगर येथील ग्राहक मंचाचे प्रमुख श्री दत्ताजी शेळके हे नाशिकला येवून वाहक व वाहनचालकांना प्रवाशांशी कसे वागावे, बोलावे याबाबत मार्गदर्शन करीत असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी रामनाथ कुटे ,अनिश काळे ,वसंत उकाडे, पप्पू पाटोळे ,पप्पू कदम, रमेश पाटोळे, गणेश वाजे ,चंदन गवळी, सुनील कानडी, गोसावी सर,शंकर उकाडे, रवींद्र कानडी,किरण कानडी, जाधव सर परीसरातील ज्येष्ठ नागरीक, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी श्री रवींद्र घोगे यांनी सिटीलिंक बससेवा सुरु झाल्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळा काळात सिन्नर येथील प्रसिद्ध हेमाडपंथी श्री गोंदेश्वर महादेव मंदीर या व इतर पर्यटन स्थळांना भेटी देणार्‍या पर्यटकांची व अभ्यागतांची मोठी सोय होणार असल्याचे सांगून परीसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाल्याबद्दल सर्व उपस्थितांचे आभार मानले व ही बससेवा अविरत सुरळीत सुरु रहावी असे मनोगत व्यक्त केले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version