Home साहित्य सीसीटीव्ही ..

सीसीटीव्ही ..

0

सी सी टी व्ही बाबा
दिवस रात्री जागतो
काही रहस्य सापडो
आशेवर फक्त जगतो

लफडे कुठले सापडे
किंमत त्याची मागतो
पोटात दडली गुपिते
कसा विचित्र वागतो

भले भले ते भ्यालेले
अब्रू वेशीवरी टांगतो
ऑपरेटरच्या कानांत
हळू आवाजां सांगतो

रेव्ह पार्टी चाले तेंव्हा
स्वताच आधि झिंगतो
बड्या धेंडाना पाहता
हेतुपुरस्सर तो पेंगतो

चटपटीत दिसते जरा
किती उल्हासा रंगतो
बळ हट्ट पुरावा त्याचे
बाळासारखेचं रांगतो

सज्जड पुरावा जेंव्हा
खळ्ळ्कन तो भंगतो
उपयोग शून्य म्हणूनि
भंगार भावात खंगतो

कुठे असे शोभे पुरता
खोट्याडोळ्यां बघतो
काहीभयानक घडता
जाग्रत टि व्ही लागतो

तंत्रज्ञान खूप उपकारी
माणूस मात्र दुभंगतो
उपाय असून कित्येक
स्वर्थी वृत्तीतच गुंततो.

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version