नवी मुंबई हरित, सुंदर, प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक व्हावी यासाठी स्त्री मुक्ती संघटना कचरावेचक महिलांच्या मदतीने ओल्या कचऱ्याचे खत, ई वेस्टची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट, प्रदूषण करणारे व विघटन न होणारे मल्टीलेयर प्लास्टिक किंवा बहुस्तरीय प्लास्टिक वर पुनर्प्रक्रिया करणे हे काम एक दशकापासून करत आहे .
यावर्षी गॅलक्सी सरफॅक्ट्टस् लिमिटेड व नवी मुंबई महापालिका यांच्या सहकार्याने महिन्याला तीन टन प्लास्टिक संकलन करत आहे, स्त्री मुक्ती संघटनेचे कार्यकर्ते शाळा, महाविद्यालय, कंपनीमधून जाणीव जागृती कार्यक्रम घेत हे प्लास्टिक डंपिंग वर जाऊ नये यासाठी प्रयत्न करतात.

ई वेव्हिकलच्याद्वारे हे प्लास्टिक उचलण्याची जबाबदारी संस्थेने घेतलेली आहे. गेल्या आठ महिन्यात संस्थेने २४ टन प्लास्टिक संकलन करून पर्यावरणाला हातभार लावला आहे. या प्लास्टिक मधून ९० बेंचेस तयार करण्यात आले आहेत. एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून यातील काही बेंचेसचे अनावरण महापौर श्रीमती सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या हस्ते या झाले.
महापौर सुजाता पाटील यांनी कचरा वेचक महिलांशी संवाद साधला व त्यांच्या कामाविषयी विचारपूस केली. आयुक्तांनी या प्रकल्पाचे कौतुक करून हे काम अधिक चांगले होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ अजय गडदे, डॉ स्मिता काळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्लास्टिक विषयी जाणीव जागृती मधून मिळालेले हे प्लास्टिक शेड वर एकत्रित आणून कचरावेचक महिलांच्या मदतीने वेगवेगळी प्रतवारी करून ठेवले जाते. पर्यावरण पूरक या कामात कचरा वेचक महिलांना रोजगारही मिळत आहे. गॅलक्सी सरफॅक्ट्टस् लिमिटेड चे श्री अमित गोरी प्रिया व विशाल आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित होते.
स्त्री मुक्ती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, अमित गोरी यांनी या प्लॅस्टिकपासून पुढे जाऊन मुलांसाठी रायटिंग पॅड, पेन, टी-शर्ट बनविण्याचा मानस असल्याचे सांगितले .
प्रा.वृषाली मगदूम यांनी प्लास्टिक संकलन यापुढेही चालू राहणार असून या पर्यावरण प्रकल्पाचा नागरिकांनीही एक भाग व्हावा असे आवाहन केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800