Home बातम्या सुनिल खेडेकर सन्मानित

सुनिल खेडेकर सन्मानित

0

पनवेल येथील साप्ताहिक “लोक दणका” या साप्ताहिकाचा आठवा वर्धापन दिन ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात नुकताच अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अनेक क्षेत्रातील मान्यवराचे सन्मान करण्यात आले.

सामाजिक कार्यात हिरीरिने भाग घेणारे के. गो. लिमये वाचनालयाचे संचालक तसेच ज्येष्ठ नागरिक संघ पनवेल शहर या संस्थेचे सचिव सुनिल खेडेकर यांचा म्हाडाचे माजी अध्यक्ष मा.बाळासाहेब पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

श्री. खेडेकर खोपोली नगरपालिकेच्या सेवेत होते. खोपोली आणि पनवेलमधील पत्रकार, संपादक, नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version