Home कला स्वागत करू या “शाल्मली”चे….

स्वागत करू या “शाल्मली”चे….

0

आज, 21मार्च. जागतिक वन दिन. यानिमित्ताने स्वागत करू या, “शाल्मली”चे....
– संपादक

काटेसावर- वर्षांवनातील एक अत्यंत महत्त्वाची भारतीय वनस्पती. Bombax Ceiba (बॉम्बक्स सिबा) असं हिचं शास्त्रीय नाव.

अत्यंत कमी पाण्यात नि कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये सहज वाढणारी आणि झाडावर नखशिखांत काटे असणारी वनस्पती, म्हणजे  संस्कृत मध्ये शाल्मली:काटेसावर.

या झाडाची उंची साधारण २०-२५ मीटर पर्यंत असते. संपूर्ण काटय़ाने मढलेली असल्याने हिला मराठीत ‘काटेसावर’ म्हणतात.
वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आता सगळं जंगल सज्ज झाले आहे. प्रत्येक झाड आपापल्या परीने तयारीला लागल्याचे दिसुन येत आहे. मात्र अवकाळी पावसामुळे जंगल परिसराचाही हिरमोड झाला आहे. तरीपण एखाद्या सण, उत्सवाप्रसंगी आपण जसं घर झाडूनपुसून लख्ख करतो त्याप्रमाणे जंगलातील प्रत्येक झाड वसंताच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

सगळ्यात आघाडीवर लक्ष वेधुन घेत असलेले वृक्ष म्हणजे काटेसावर आणि पळस. ही झाडेही अवकाळी पावसाने स्वच्छ होवुन सगळी पानं गाळून वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सज्ज  झाली आहेत.

या झाडांना जानेवारीमध्ये आलेल्या कळ्याची आता फुले होवुन पानझडी झालेल्या  जंगलात आपले स्वतंत्र अस्तित्व  मोठ्या दिमाखात वसंत ऋतूच्या स्वागतासाठी फुलांनी बहरून  सज्ज झाल्याचे दिसत आहे.

संपूर्ण निष्पर्ण झाडावर ही मोठी मोठी गडद गुलाबी फुले पाहणे हा एक नयनरम्य सोहळा नुकताच नांदेड जिल्ह्यातील मुदखेड  धर्माबाद परिसरात अनुभवता आला.
आपण ही तो पहावा, असाच आहे.

विजय होकर्णे

– लेखन, छायाचित्रे : विजय होकर्णे. नांदेड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version