Home लेख हलकं फुलकं : दाढी

हलकं फुलकं : दाढी

1

हलकं फुलकं या सदरात यापूर्वी श्री विलास
कुडके यांनी “मिशी” विषयी मिश्कीलपणे लिहिले होते. आज “दाढी” विषयी लिहितायेत कवी श्री ओमप्रकाश शर्मा…

सध्या दाढी ठेवणं किंवा वाढवणं फॅशन नसून आवश्यक झाले आहे. पंतप्रधानांपासून ते अगदी फिल्म हिरो पर्यंत. दाढी असेल तर यशच यश. अन्यथा अपयश !

नुकतंच महाराष्ट्र राज्यातील सत्तानाट्य आपण बघितले. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून ऐनवेळी पत्ता कापला गेला आणि चक्क शशदाढी युक्त एकनाथ शिंदे “झुकेगा नही” म्हणत मुख्यमंत्री झाले ! अशी आहे दाढीची शक्ती वा जादू.

मला तर वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अविरत सफलतेचे गुढ त्यांच्या दाढी मध्ये लपलेले आहे. तसेच राहुल गांधींचं अपयश दाढी नसल्याने पिच्छा सोडत नाही. कुणीतरी राहुल प्रेमीने राहुल गांधी पर्यंत हा सफलतेचा मंत्र पोहोचता करायला हवा.

उ ठा अर्थात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांसारखी दाढी ठेवली असती तर असं उठावं लागलं नसतं.

दाढी ठेवण्याचे अनेक प्रकार नव्हे तर स्टाईल आहेत. लांब दाढी, फ्रेंच, बुल्गानीन, छोट्या छोट्या केसांची तर काही जण नुसतं खुंट वाढलेली ठेवतात. यू ट्यूब वर १०० पेक्षा अधिक प्रकारच्या स्टाइलची माहिती उपलब्ध आहे.

७० च्या दशकात गुळगुळीत दाढी करणाऱ्या चाॅकलेटी हिरोंचा काळ होता पण आता अल्लु अर्जुन सारखी वा कोहली सारख्या दाढी वाल्यांचं युग आहे. त्याकाळी दाढी म्हणजे आळसावलेल्या व्यक्तींच प्रतिक मानलं जात असे वा गुंडगिरीचं.

असो. ज्यांना ज्यांना यशाची शिखरे पादाक्रांत करायची असेल तर दाढीची गुरुकिल्ली मुखचंद्रावर ठेवायला हवी.

प्रकाश शर्मा

– लेखन : ओमप्रकाश शर्मा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version