Home साहित्य हिरव्या रानी

हिरव्या रानी

5

बनात केतकीच्पा नाग सळसळे
रानात हिरव्या उडती फुलपाखरे
नाचात नर्तकीच्या बोले घुंगरू
स्वप्नात नववधूचे मन बावरे

तरारले रान हिरवे हिरवेगार
फुलारले डोलारे झुपकेदार
शहारले होता दवस्पर्श हळूवार
पसरले कोवळे ऊन,हटे निहार

तुरे श्वेत-जांभळे तृणपात्यातले
पुरे-पुरे बाबांनो माना उंचावणे
गुरे वासरांचे रानोमाळ पाहे धावणे
स्फुरे गुराख्यास पावा वाजवणे

हिरव्या रानी बरसे मेघमाया
धरेच्या कानी वर्षाराणीचे गुज
झर्‍याची गाणी रुमझुम पैंजणी
पानोपानी पक्ष्यांची कुजबुज

— रचना : विजया केळकर. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

5 COMMENTS

  1. मानवी भावभावना आणि निसर्गसौंदर्याचा सुरेख
    शब्दाविष्कार !

  2. केतकीच्या बनी नाग सळसळले
    अन् सखीचे काव्य खूपच आवडले
    तरारले रान हिरवेगार
    अन् दव स्पर्शाने मन झाले हळुवार
    तुरे श्वेत जांभळे तृणपात्यातले
    अन् धरतीचे देखता सौंदर्य मन सुखावले
    हिरव्यारानी बरसे मेघमाया
    अन् नभांगणी सप्तरंगी किमया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version