Home साहित्य होळी : काही कविता…

होळी : काही कविता…

0

आज होळी आहे. त्या निमित्ताने काही कविता सादर करीत आहे. आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

1) होळी

आला होळीचा सण आला
उधाण आले आनंदाला
प्रश्न पडला मनाला
कोणावर कोणता रंग ऊडवावा ?

बसले होते पूजेला
समोर फोटोत रामलला
रामनामाचा रंग उडवला
गोड खळी पडली गालाला
मजकडे पाहून हसला

देव्हाऱ्यात बाळकृष्ण बसला
सुदाम मैत्रीची पुरचुंडी त्याला
नैवेद्य होळीचा दाखवला
दूर लोटूनी लोण्याचा गोळा
बाळरूप ते, मैत्रीचे पोहे खाऊ लागले
जपावे मैत्रीसआशीर्वाद दिला

— रचना : सुलभा गुप्ते. पुणे

2) आधुनिक होळी…. आजची गरज

हिंदुत्वाच्या धगधगत्या मशालीने;
होळी पेटवू जागरुकतेची,
होळीच्या त्या पवित्र अग्नीत
राख व्हावी सूडाची अन् त्वेषाची!

बीभत्स नि विकृत मनोवृत्ती जळूनी खाक व्हाव्या,
अश्लीलता अन् असूरी वृत्ती त्या धगीने जळून जाव्या !

सकारात्मक विचारांचा मनामनात अग्नी प्रज्वलित व्हावा,
नकारात्मक विचार नि कटकारस्थानांचा राक्षस दहन व्हावा !

मानवतेच्या ठिणगीने मने लख्खपणे उजळून निघावी,
अमानुष, पाशवी, निर्घुण प्रवृत्ती जळूनि नष्ट व्हावी!

पुरणपोळीच्या गोडीसारखी वाणीत मधुरता यावी,
जायफळ वेलचीच्या चवीप्रमाणे
नात्यांत आपुलकीची भर पडावी !

रंगपंचमीच्या निमित्ताने नात्यांमधली रंगत वाढावी,
निस्सिम प्रेमाच्या लखलखीत प्रकाशाने
नातेसंबंधांना झळाळी यावी !

होळी पौर्णिमा आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !✨

— रचना : योगिनी चेतन पंडित. डोंबिवली.

3) होळी 🙏🙏            

होळीचा सण
आनंदी क्षण
चैतन्य दाटतो
मनामनात

जाळू सुका पाचोळा
तोडू फांद्या वाळलेल्या
शेणी करुनी गोळा
होलिका होईल प्रसन्न

पोळी पुरणाची
करु नैवेद्यासाठी
बत्तासे गाठी
होलिकेसाठी

होळीचा सण
अहंकार दहन
द्वेष मत्सराचा
करु या त्याग

जागवू विवेक
दूर सारु विनाश
स्नेह वृद्धिंगत
प्रेमाची रंगत

निसर्गाशी मैत्र
जगू सहजीवन
प्राणपणाने जतन
सांभाळू पर्यावरण

नको हाती शस्त्र
नको मारा क्षेपणास्त्र
हृदयी जपू या मैत्र
परस्परात एकदिलाने…

— रचना : काव्य प्रभा. लातूर

— संपादन’: देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 91 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version