Home बातम्या १५ वे सावरकर संमेलन भूतान मध्ये !

१५ वे सावरकर संमेलन भूतान मध्ये !

1

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दूरदृष्टीचे विचार आणि कार्य जगभर पोहोचावे यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळ, छत्रपती संभाजीनगर सातत्याने विविध उपक्रम हाती घेत असते.

या उपक्रमांचा एक भाग म्हणून या मंडळाने आतापर्यंत छ. संभाजीनगर, अंदमान, मेळघाट, भगूर -नाशिक, हम्पी – कर्नाटक, इंदौर- मध्य प्रदेश, मॉरिशिस, लंडन, श्रीलंका, दुबई, बाली, इंडोनेशिया, सिंगापूर, जपान या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलने साजरी यशस्वीपणे आयोजित केली आहेत.

आता १५ वे संमेलन दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी भूतान येथे होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री भाऊ सुरडकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या संमेलनाचे अध्यक्ष सावरकर साहित्याचे अभ्यासक श्री सुधीर सेवेकर हे असून स्वागताध्यक्ष सावरकरांच्या पत्रकारितेचे अभ्यासक श्री देवेंद्र भुजबळ हे आहेत. ज्येष्ठ साहित्यिका स्नेहलताई पाठक, विचारवंत श्री शंकरराव गायकर यांच्यासह भूतान राजघराण्यातील व्यक्ती, तेथील विद्यापीठातील मान्यवरही उपस्थित राहणार असून संमेलनामध्ये भूतानचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात येणार आहे. संमेलनात सहभागी होणाऱ्यांना पुढे भूतान पाहण्याची संधी देखील मिळणार आहे.

तरी अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री भाऊ सुरडकर यांच्याशी 9823267100 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनये मंडळाने केले आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. श्री सेवेकर तसेच श्री भुजबळ दोघांचेही अभिनंदन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version