Home साहित्य 🌱वृक्षारोपण🌱

🌱वृक्षारोपण🌱

0

साकव्य विकास मंच आयोजित अभंग स्पर्धेत “सर्वोत्कृष्ट अभंग” म्हणून पुरस्कार मिळालेली रचना पुढे देत आहे. श्रीमती ज्योत्स्ना तानवडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन💐

बीज अंकुरले | मातीच्या कुशीत |
धरा कृपावंत | आनंदली ||

उन वारा पाणी | मिळण्या पोषण |
विश्वाचे अंगण | बीजा तुला ||

मुळे घट्ट ठेवी | झेप घे अंबरी |
कर्तृत्व अंतरी | ठेवी सदा ||

आला पावसाळा | वसुंधरा दिन |
रोपे जगविन | जीवेभावे ||

झाडे बहुमोल | धन धान्य देती |
शुध्द हवा देती | जगण्यास ||

निसर्गाचा तोल | झाडे ही राखती |
सोयरे सोबती | आपुलेची ||

धरित्रीची माया | मिळे झाडातून |
समृद्धी देऊन | कृपा करी ||

ज्योत्स्ना तानवडे

– रचना : ज्योत्स्ना तानवडे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version