Home साहित्य 🌳 दोन झाडा 🌳

🌳 दोन झाडा 🌳

0

वडान इचारल्यान,
आपट्याच्या झाडाक,
रडत बसून,
सांगतस कोनाक ॥

वरसातून येकदा,
आपलो मान,
हलवन गदागदा,
जाता प्राण ॥

उत्सव करतास,
मांडतास पूजा,
कळत नकळत,
आमका इजा ॥

दोर गुंडाळून,
वडाक फिरतास,
देव मानून,
जखडून ठेवतास ॥

पाना तोडून,
पालोपाचोळाे करतास,
निर्जीव पाना करून,
“सोनं” मानतास ॥

दसऱ्याच्या दिवसाक,
मान दीतास,
दुसऱ्या दिवसाक,
पायाखाली तुडवतास ॥

कसली श्रद्धा,
नि कसली भक्ती,
छल करून,
खेळतास युक्ती ॥

करा साजरे सण,
ना नाही आमची,
आमका हा मन,
विटंबना नको झाडांची ॥

सजीव घटक,
शास्त्रात लिवलास,
“दु: ख” घटक,
तेवढाच ईसारलास ॥

कोरोना महामारीत,
धडो गावलो,
शुद्ध हवेत,
ऑक्सिजन वाढलो ॥

आनंदी उत्सवात,
मर्यादो पाळा,
आमच्या बलिदानात,
धोको टाळा ॥

वर्षा भाबल.

– रचना – सौ.वर्षा महेंद्र भाबल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version