क्षण सुखाचे आनंदाने जगावे.
क्षण दुःखाचे विसरून जावे.
प्रत्येक क्षण असतो मोलाचा.
भरोसा नाही कनभर क्षणाचा.
क्षण हा प्रेमाचा हळूवार जपने.
हदयाच्या गाभाऱ्यात मायेने बसने.
क्षण हा त्यागाचा भाग्यवान असतो.
त्यागणा-या जिवात मला देव दिसतो.
क्षण आनंदाचे साठवावे मनात.
मनातील भावना सांगाव्या कानात.
आयुष्याच्या वाटेवर काही क्षण रुतून बसतात. आठवणीच्या सागरात क्षण मनोमन हसतात.
भाग्याचा क्षण प्रेमाने ओंजळीत घ्यावा.
आठवणीच्या प्रवाहात मनोसोक्त जगावा.
ओलावा मायेचा हवाहवासा वाटतो.
दुःख होता मनाला कंठ मनात दाटतो.
– रचना : सौ भारती वाघमारे, मंचर, जि-पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
