Home साहित्य 🎵“उधू दादा मुंबईला”

🎵“उधू दादा मुंबईला”

0

बडबड गीत 🎵

उधू दादा, उधू दादा, आणि
पोहचला मुंबईला,
नाशिकहून आनंदाने,
नवी दुनिया बघायला ।

मुंबईत जाऊन थेट, समुद्रकिनारी पोहोचला,
“खबडत खबडत घोडोबा” म्हणत, घोड्यावर बसला। 🐎
घोड्यावर बसून घोडा हाकला,

समुद्रात उतरून मग, ती भाषेच्या
लाटांशी खेळला। 🌊
वाळूत चालता चालता,
थोडासा तो दमला,

तरीही बॉल, बॉल खेळत, आनंदाने रमला ।
किनाऱ्यावर क्रिकेट खेळला हे
बॅट फिरवून चौका मारला !
नंतर मारला मोठा सिक्स,
जिंकून मॅच केली फिक्स ! 🏏

जॉर्डन काकाचा कॅच पकडून आऊट केला छान,
उधूने उंचावली पप्पाची मान!
“कमाल केली!” म्हणत सगळ्यांनी केला टाळ्यांचा गजर

उधू दादा बसला पप्पाच्या खांद्यावर 👏
ऊधू दादाने खुप धमाल केली,
आनंदाची लयलूट झाली

सोबत होते मम्मी-पप्पां,
प्रेमाने मारल्या बोबड्या गप्पा । ❤️
मॉलमध्ये जाऊन मजा केली भारी,
उधू दादाची स्टाईलच न्यारी ,
सगळ्यांना वाटली खूपच प्यारी! 🏙️

मुंबईत भेटला गोड बाळ,
त्याच्याशी जुळली त्याची नाळ,
मैत्रीची झाली सुरुवातच खास । 👶

रिझर्व बँक दिसताच ओरडला जोरात
“मीच गव्हर्नर!” म्हणत हसला खास। 😄
भारताचा आर्थिक सल्लागार, उधू दादा भारी,
मुंबईला जाऊन केली, सुरुवातच न्यारी ।

असा आमचा उधू दादा,
आनंद देतो, आनंद घेतो ,
लाडाने सगळ्यांना हसवत राहतो ! 🌟

— रचना: डॉ चंद्रकांत हलगे. नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version