Home साहित्य 🏏 विश्व चषक

🏏 विश्व चषक

0

नमस्कार मंडळी.
भारतीय महिला क्रिकेट संघाने कालच विश्व चषक जिंकला आणि देश भर जल्लोष झाला. आपण हा आनंद पुढील कविता वाचून आज पुन्हा एकदा साजरा करू या.
— संपादक

उत्साह यंदा शिगेला
स्पर्शे आनंदे नभास
स्वप्नपूर्ती देई स्फुर्ती
सत्यात येई आभास

गवसणी घाला सुखे
अंति विश्वचषकांस
अद्वितीय आत्मानंद
देई रसिक प्रेक्षकांस

विजय स्व:ताचं हजर
बदले सगळे कयास
सोपे नव्हते जिंकणे
अथक सराव प्रयास

मैदानात रे खचाखच
भरला संपूर्ण विश्वास
उत्कंठा वृध्दी खेळात
रोखून धरलेला श्वास

उंचावलेल्या अपेक्षा
परिपूर्ण केल्या खास
बाजी लावे बाजीगर
संतृप्त करे रसिकांस

महिला विजय प्रतिक्षा
सरे क्षणैक वनवास
भारतीय ऐक्य भावना
सार्थ केलाय विश्वास

पुन्हा आली दिवाळी
आतिषबाजी गं खास
जगत्जेती नारी शक्ती
पुन्हा रचला इतिहास

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version