Home साहित्य 💃💃दही हंडी💃💃

💃💃दही हंडी💃💃

0

गोकुळच्या नारी आम्ही आलो ग
दही हंडी फोडण्या जमुया ग ।।धृ।।

थरावर थर कसे डोंगरच दिसती
गाणी गातांना तालावर डोलती, दही हंडी /१/

हळूच चढती, हळूच घसरती
बाजी मारूनी गोविंद जिंकती, दही हंडी /२/

लाविला हंडीला नारळ वरती माळ
करती प्रसादाचा काला गोपाळ, दही हंडी /३/

जोमान खेळती दही हंडी फोडीती
किती दुखावती बाळ गोपाळ ती, दही हंडी /४/

नाही कशाची त्यांना फिकीर
होई गोप गोपिंचा हो सत्कार, दही हंडी /५/

इथे मिलन कसे सर्वांचे होई
जाती भेद सारी विसरुनी जाई, दही हंडी /६/

गोप गोपिंचा मेळा जमनार ग
त्या सर्वांत गोविंद दिसतील ग, दही हंडी /७/

शोभा कोठावदे

– रचना : सौ.शोभा प्रकाश कोठावदे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version