कसे जगावे, कसे जगावे
फुलांकडून शिकावे
जाईजुई लखडल्यात कमानीला
नम्रता शिकवीत जगाला
अबोलीचा स्त्रीमुक्ती मोर्चा गुच्छाने उभा
गर्भातील संस्कार न विसरता
निशीगंधा कसा ताट मानेनं उभा
एकलव्या सम हा चाफा
विना आधाराने उभा
जास्वंदीचा वाटतोय साऱ्यांना हेवा
रातराणी गंधाळतेय प्रेमिकांना
सोसले घात आघात झेंडूने
तरी उभा झुंडीने
अनंत बसलाय निवांत
कोणताहि भ्रांत न ठेवता मनात
खाचखळग्यात ही फुलते सदाफुली
हसतमुख सामोरी ही लिली
प्राजक्ताचा सडा पाय मागे ओढतोय
मोगऱ्याच्या कळ्यात अजुनही जीव गुंततोय
गुलाबाचा काटा खोलवर बोचतोय
पाष्कळ बडबडी तगार
कशी झाली बगा हद्दपार
मरावे परी कीर्तीरूपे उरावे
शिकवितात ही बकुळफुलें
क्षणभंगुर हे जीवन
कसे जगावे, कसे जगावे
फुलांकडून शिकावे
– रचना : आशा दळवी. दूधेबावी, फलटण

Very nice poem.
🌹अतिशय सुंदर रचना 🌹
सर्व फुलांची गुंफुन माळ
बहारली कविता
अति सुंदर.
धन्यवाद
अशोक साबळे
Ex. Indian Navy