Home साहित्य बाईचा जन्म

बाईचा जन्म

1

अल्लादिनचा चिराग
हळूं पाहिला घासून
ब-याचं वेळे नंतर रे
जीन निघाला त्रासून

मी अक्काचा गुलाम
महिलादिवस म्हणून
काम करणार त्यांचे
रे घेई आका जाणून

ताईंची सगळी कामे
करतो सकाळपासून
एक काम संपले कि
दुसरे उभे आ वासून

राक्षसी कामे थकेना
जीनच गेलायं थकून
महिला व्यग्र कामात
देती स्वतांस झोकून

बाईचा जन्म कठीण
आज आले उमजून
कधीतरी माऊलीला
कुणी घेतले समजून

अखंड कार्यमग्न तरी
ना गेली ती कोमेजून
स्वागता सिध्द हसत
कशी ये सजून धजून

जीनपरतला दिव्यात
विचार नवा उजळून
दिव्यदिवा नारी तूचि
पुरुषी अहं गं जाळून

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version