Friday, January 3, 2025
Homeलेखअशी साजरी करु या वटपौर्णिमा !

अशी साजरी करु या वटपौर्णिमा !

वटपौर्णिमा शुक्रवार दि.२१ जून २०२४ रोजी आहे. पण परंपरेप्रमाणे महिलांनी त्या दिवशी फक्त वडाची पूजा न करता, आपण सर्वांनीच वट रोपण करावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक श्री दिलीप गडकरी यांनी केले आहे. ही अभिनव आणि काळाची पावले ओळखून मांडलेली कल्पना निश्चितच स्वागतार्ह आहे. ती आपण प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प करू या….
संपादक

वटवृक्ष म्हटले की, महाकाय असे वडाचे झाड आपल्या डोळ्यासमोर येते.

जगातला सर्वात मोठा वटवृक्ष अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आहे. अमेरिकन लोक ‘जनरल शार्मन ट्री’ या नावानं त्या झाडाला ओळखतात.

आपल्या भारतात कलकत्याच्या ‘सुंदरबन’ बागेत एक वटवृक्ष एवढा प्रचंड आहे की, त्याचा पसारा कित्येक फर्लागभर पसरलेला आहे. हा देशातला सर्वात मोठा वृक्ष असून, त्याच्या पारंब्याची संख्या १०० च्या वर गेली आहे. त्याच्या मुख्य खोडाची जाडी (व्यास ) ३६० मीटर्स एवढी असून तो वयाने २०० वर्षापेक्षा जास्त आहे.

दुसरा असाच प्रचंड वटवृक्ष गुजरात राज्यामध्ये नर्मदेच्या मुखाजवळ आहे. त्याचा देखील विस्तार एवढा मोठा आहे की, त्याच्या पारंब्याची संख्या ३५० च्या वर गेली असून खोडाचा परीघ २२०० फूट विस्तारित झाला आहे. मुख्य पारंब्यानाही ३००० खंडे फुटली आहेत. त्याच्या सावलीत एका वेळेला पाच हजार माणसं सहज बसू शकतात.

वडाच्या झाडाच्या आसपासच्या जमिनीत हमखास पाणी असतेच. त्यामुळे वडाला ‘पाणीदर्शक’ वृक्ष मानतात. आयुर्वेद शास्त्रातही वडाचे महत्व फार आहे. यापासून अनेक औषधे बनवतात. वड हा शीतल, मधुर, तुरट, जड असून पित्त, ज्वर, तृष्णा, दाह, वांती इत्यादींचा नाश करतो. हा वृक्ष प्रदूषण नियंत्रक सुध्दा आहे.

वीस वर्षांपूर्वी वाराणसी येथे भरलेल्या विज्ञान परिषदेमध्ये शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षांमध्ये असे म्हटले आहे की, पन्नास वर्षांत हा वृक्ष मानवाला आणि इतर जीवांना पंधरा लाख सत्तर हजार रुपये किमतीची सेवा पुरवतो. त्यामध्ये प्रामुख्याने हे झाड अडीच लाख रुपये किंमतीचा ऑक्सिजन वायू विस्तरित करून पाच लाख रुपये किमतीचे प्रदूषण नियंत्रित करतो. जमिनीची धूप टाळण्यासाठी तीन लाख रुपये किमतीची सेवा प्रदान करतो. पाणी, वाफ व त्याचे पुन्हा पाणी (पाऊस) ही चक्रगती कायम ठेवण्यास मदत करून आर्द्रतेच्या नियंत्रणासाठी साडेतीन लाख रुपये किमतीची मदत आर्थिक स्वरूपात घडवून आणतो. पशू व पक्षी यांना निवारा देण्यासाठी पुन्हा अडीच लाख रुपये किमतीची सेवा देतो आणि प्रथिने, औषधे निर्मितीसाठी वर्षाला वीस हजारांहून जास्त रुपयांची आर्थिक प्राप्ती मिळवून देतो.

असे हा वट वृक्ष मोठ्या प्रमाणात लावणे व जगवणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. त्यासाठी वटपौर्णिमा हा सण फक्त महिलांपुरता मर्यादित न रहाता पुरुषांनी सुद्धा सहभागी व्हावे. शासनाने हा दिवस, वृक्षारोपण दिन म्हणून जाहीर करावा.
पर्यावरण प्रेमी संस्था, शाळा, महाविद्यालये आणि इतरही सामाजिक संस्थांनी या कामी जास्तीत जास्त सहभाग घेऊन सहकार्य करणे, ही काळाची गरज आहे.

दिलीप गडकरी

— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. नमस्कार संपादक, आज खूप वर्षांनी आपले वृत्तपत्र वाचते आहे. श्री गडकरी यांचा वटपौर्णिमा वर लिहीलेला लेख छान माहितीपूर्ण आहे. हा सण फक्त बायकांनाच मर्यादित नसावा हे पण एकदम मान्य आहे. जास्तीत जास्त सर्व प्रकारची झाडे लावून आपण सहकुटुंब हा सण साजरा करायला हवा. श्री गडकरी यांचे आभार मानते.

  2. Very nice 👌,
    अमेरिकेत अशा जून्या वृक्षांचे संवर्धन करून त्याची प्रेक्षणीय पार्क बनवली आहेत .आपणही हा आदर्श घ्यायला हरकत नाही

  3. वटपौर्णिमेचा नवीन काळात लावलेला अर्थ सुरेख आणि निस्चितच अनुकरणीय.

  4. दिलीप गडकरी सरांनी वटपौर्णिमा साजरी करण्याचा उत्तम मार्ग सुचवला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने वटपौर्णिमेला “वृक्ष संवर्धन दिन” म्हणून मान्यता दिलेली आहेच; इतरही राज्यांमध्ये अशी जनजागृती करणे आवश्यक आहे. लेखामध्ये दिलेली अमेरिकेतील, तसेच भारतातील पश्चिम बंगाल व गुजरात येथील वटवृक्षांची माहिती खूप छान आहे.दिलीप गडकरी सरांचे हार्दिक अभिनंदन 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pratibha Saraph on नव वर्ष ..
आशी नाईक on कवी
विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !