फारच मजेदार आहे आयुष्याचं गणित,
नियम याचे वेगळे, वेगळी सोडवण्याची रीत,
येथे आहेत सारे भावनांचे आकडे,
विचाराचा गुंता, घालतो नवे कोडे,
कोणताही प्रसंग असो, सल्ला देणारे आहेत,
विचारलं नाही तरी, मुद्दाम सांगणारे आहेत,
प्रत्येकाला वाटतं आपलंच उत्तर खरं,
हसू येते आपल्याला, हे साऱ्यांनाच लागू बरं,
येथे नाही कुठली शाळा, प्रत्यक्ष अनुभव घ्यावा,
बरेचदा चुकल्यानंतर, तीर तो लागावा,
नाही कुठली शाबासकी, नाही कुठला शेरा,
जिंकणे आहे ज्याला, त्याला जन्मोजन्मीचा फेरा…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800