इयत्ता ५ वी व ८ वी या वर्गांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल. नुकताच जाहीर झाला आहे.
या परीक्षेसाठी पुण्याजवळील आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळाच्या सरस्वती माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ५ वी चे २७ विद्यार्थी बसलेले होते. त्यात ७ विद्यार्थी पात्र झालेत. त्यातील ३ विद्यार्थ्यांना २०० च्या पुढे गुण मिळाले. ते असे :
१) कु. झीनत मुलानी :- २१०.
२) चि. ऋषिकेश घोलप :- २०८.
३) कु. ललिता चौधरी :- २०४.
या विद्यार्थ्यांना मराठीचे अध्यापन सौ.कल्पना उभे मॅडम, गणिताचे अध्यापन सौ.सविता पाटील मॅडम व सौ.रेश्मा बनसोडे मॅडम, इंग्रजीचे अध्यापन सौ.प्रतिमा काळे मॅडम, बुद्धिमत्ता चे अध्यापन श्री.काळूराम पवार सर व श्री.राहुल वांगेकर सर यांनी केले.यातील चि. ऋषिकेश घोलप व कु. झीनत मुलानी या दोन विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात ५० पैकी ५० तर कु.श्रेया साठे या विद्यार्थिनीला ५० पैकी ४६ गुण मिळाले. इयत्ता ५ वी चा शिष्यवृत्तीचा २५.९३% निकाल लागला.

इयत्ता ८ वी चे ३९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते त्यातील १२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यातील कु.वैभवी शिंदे हिस २४४ गुण; चि.आदित्य शेळवने यास २१४ गुण; चि.ललित कुंभार यास २०२ गुण प्राप्त झाले आहेत. या सर्वांना मराठीचे अध्यापन श्री.अविनाश शिरसाट सर, गणिताचे अध्यापन सौ.बेंडाळे मॅडम व श्री.सोनवणे सर, इंग्रजीचे अध्यापन सौ.स्वाती बच्छाव मॅडम, बुद्धिमत्ता चे अध्यापन श्री. जगदीश चव्हाण सर यांनी केले. इयत्ता ८ वी शिष्यवृत्तीचा निकाल ३०.७६% लागला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थापक श्री.गोविंदजी दाभाडे सर, प्राचार्या सौ.संगीता गुरव मॅडम, उपप्राचार्य श्री. विजय बच्चे सर, पर्यवेक्षक श्री.संजय कांबळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्या, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, इतर कर्मचारी वर्ग व पालकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800