Wednesday, September 17, 2025
Homeबातम्या"करिअरच्या नव्या दिशा" पुस्तक युवकांना मार्गदर्शक - मंगल प्रभात लोढा

“करिअरच्या नव्या दिशा” पुस्तक युवकांना मार्गदर्शक – मंगल प्रभात लोढा

महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची सखोल माहिती देणारे “करिअरच्या नव्या दिशा” हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास कौशल्य विकास, स्वयंरोजगर विभागाचे मंत्री तथा मुंबई चे पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा
यांनी व्यक्त केला. श्री लोढा यांच्या हस्ते आज मुंबई महानगर पालिकेच्या पत्रकार कक्षात या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.

श्री लोढा पुढे म्हणाले की, राज्यातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्याच्या दृष्टीने राज्याचा कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता विभाग गतिमानतेने कार्य करीत आहे, विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे.त्यामुळे युवकांनी अधिक सक्रिय होऊन या संधींचा लाभ घेतला पाहिजे आणि स्वतः बरोबर देशाचे हित साधले पाहिजे. देशातील प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहोरात्र झटत आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पुस्तकाचे लेखक, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी परिश्रमपूर्वक, अतिशय अभ्यास करून लिहिलेल्या या पुस्तकाबद्दल श्री लोढा यांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रारंभी पुस्तकाची माहिती देताना श्री भुजबळ यांनी सांगितले की, या पुस्तकात भारत सरकारच्या, महाराष्ट्र शासनाच्या आणि इतर राज्य सरकारांच्या मिळून जवळपास ७०० अभ्यासक्रमांची माहिती आहे. या पुस्तकामुळे युवकांना आपली आवड ओळखून करिअरची निवड करण्यास नक्कीच मदत होईल.

आवडीनुसार करिअर निवडल्यास थकवा, कंटाळा, स्ट्रेस न जाणवून हे युवक आनंदाने आपले जीवन व्यतीत करू शकतील.

या कार्यक्रमास मंत्री श्री लोढा यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री दिलीप हिरवाळे, स्वीय सहायक श्री पंकज पाठक, विभागाच्या संपर्क अधिकारी संध्या गरवारे, या पुस्तकाचे प्रकाशन केलेल्या न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशनच्या प्रकाशिका अलका भुजबळ आदी उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आजच्या काळात युवकांना,रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यवसाय यांची योग्य माहीती देणे आवश्यक आहे.त्या दृष्टीने हे पुस्तक युवकांसाठी मार्गदर्शक ठरेल. एका दृष्टीने हे राष्ट्रीय आणि सामाजिक पुनर्बांधणीचे कार्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं