Wednesday, February 5, 2025
Homeबातम्याकल्याण : चमकदार विज्ञान प्रदर्शन

कल्याण : चमकदार विज्ञान प्रदर्शन

कल्याण (पूर्व) येथील नुतन ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाने नुकतेच “अविष्कार : कल्पकतेकडून कृतीकडे” या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

या प्रदर्शनात सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर एकूण ६१ प्रकल्प सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली.

प्रदर्शनाचे उद्घाटन सौ. प्रतिभा शांताराम गवळी, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा, चिंचपाडा, कल्याण पूर्व व सौ भारती ओंकारेश्वर, मुख्याध्यापक, जरीमरी प्राथमिक विद्यालय, कल्याण पूर्व यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रदर्शनाचे परीक्षण मा. श्री मिलिंद धंबा, सहाय्यक शिक्षक, गणेश विद्या मंदिर, कल्याण पूर्व आणि श्रीमती योगिता अरविंद मिसर, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, चिंचपाडा, कल्याण पूर्व यांनी करून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे कौतुक केले. तसेच विज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला.

प्रदर्शनामध्ये औषधी वनस्पतींचे उपयोग, पुर्नप्रक्रिया आणि पुर्नवापर, भारतीय संशोधकांनी लावलेले शोध, अपारंपारिक ऊर्जा निर्मिती, संगीतमय विज्ञान प्रकल्प व सादरीकरण, वैद्यकीय शास्त्र यांसारख्या विविध विषयांवर आधारित प्रकल्प सादर करण्यात आले.

या सर्व प्रकल्पांनी पालकांचे, परीक्षकांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रेक्षकांची मनी जिंकली

पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या नव्या संधींची ओळख झाली आणि त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी