Friday, January 3, 2025
Homeलेखकामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य

कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य

प्रत्येक व्यावसायिक हा उत्पादकता आणि कार्यक्षमता यावर लक्ष केंद्रित करीत असतो. कायद्याच्या चौकटीचा विचार केल्यास कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षा या बाबींकडे विशेषतः लक्ष देणे गरजेचे असते. जेणेकरून अपघातावरील नियंत्रणाबरोबरच कामातील उत्पादकता वाढवण्यास उपयुक्त ठरते. परंतु ह्याच्या जोडीला मानसिक आरोग्याचा विचार हा देखील तितकाच महत्त्वाचा वाटतो. आरोग्य सुस्थितीत असल्यास यामधील उपयुक्तता अधिक वाढते असे निदर्शनास आल्यामुळे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचा विचार करणे फारच महत्त्वाचे आहे.

शारीरिक आरोग्याकडे आपण जितके लक्ष देतो तितके लक्ष आपण मानसिक आरोग्याकडे देत नाही. उलट मानसिक आजार लपविण्याकडे किंवा स्वतःशीच सुध्दा मान्य करण्याकडे आपला अजूनही कल नसतो. म्हणूनच मानसिक आरोग्याविषयक जन जागरण होण्यासाठी 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्यदिन म्हणून साजरा केला जातो. रोजचे धावपळीचे दैनंदिन जीवन, कामकाजातील ताण, संघर्ष, घरगुती प्रश्न, आर्थिक अस्वस्थता इत्यादींचे विचार खरंतर मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकत असतात. त्यासाठीच मानसिक आरोग्याचा सकल विचार करणे सद्यस्थितीत गरजेचे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार कामाच्या ठिकाणी 12 अब्ज कामाच्या दिवसाचे नुकसान केवळ नैराश्य व चिंता या कारणांमुळे होते. त्यामध्ये जवळजवळ दहा हजार कोटी रुपयांच नुकसान होत असते. जवळजवळ पंधरा टक्के लोक हे मानसिक आरोग्य समस्येची निगडित असतात आणि ही आकडेवारी खरोखरच चांगली नाही.

आधुनिक राहणीमान, लहान कुटुंब, सामाजिक कार्याचा अभाव, अल्पसंवाद आणि दैनंदिन धावपळ ह्यामुळे लोकांमधील मानसिक आरोग्याचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. असे जरी असले तरी भारतात मानसिक आरोग्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही जुनाच आहे. त्यामुळे लोक या विषयावर बोलण्यास सहजासहजी तयार नसतात. प्रत्येक वेळेस मनोरुग्णाकडे जाणेच आवश्यक नसते तर ह्या विषयावरील कौन्सिलर तसेच इतर एक्सपर्ट यांचाही सल्ला घेतला जाऊ शकतो. काही ऑर्गनायझेशन मध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेगळा सेल निर्माण केला जातो तसेच काही इन्स्टिट्यूट बरोबर सुद्धा टायअप केले जाते. यामुळे व्यक्ती स्वतःहून पुढे येऊन त्याच्या समस्या मांडून त्यांचं योग्य ते नीराकारण करतात आणि सद्यस्थितीत हे गरजेचे सुद्धा आहे.

मानसिक आरोग्याचे महत्त्व खूप मोठे आहे. मानसिक आरोग्य शास्त्राचा विचार करावयाचा झाल्यास कामाच्या ठिकाणी हसत खेळत वातावरण निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यवस्थापन आणि कामगार या दोघांमध्ये समन्वय असावयास हवा. संतुलित मानसिक आरोग्याचा विचार केल्यास ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सुरक्षित आणि आरोग्यदायी कामाचे वातावरण निर्मितीसाठी पोषक ठरू शकतात.

मानसिक आरोग्य चांगले असेल तर व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता वाढते, आत्मविश्वास वाढतो त्यासाठी सकारात्मक नातेसंबंध, कामावरील सहकार्याची भावना, काही प्रमाणात का होईना सामाजिक बांधिलकीचा विचार इत्यादी बाबी जीवन अधिक आनंददायक, सक्रिय व सफल होण्यास नक्कीच मदत होईल. मानसिक आरोग्याच्या सुधारणेसाठी योग्य उपाय योजना, समर्थन आणि जागरूकता आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला आणि आपल्या प्रियजनांना मानसिक आरोग्याची योग्य काळजी घेत जीवन सुखकर बनविता येईल.

सुधीर थोरवे.

— लेखन : सुधीर थोरवे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. छान सौम्या पध्दतीने श्री थोरवे यांनी विषय समजावून सांगितला आहे.

  2. कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य हे जागतिक आरोग्य संघटनेचे यावर्षीचे घोषवाक्य असल्याने यावरील थोरवे यांचा हा लेख उद्बोधक आहे
    पण मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची आजही तयारी नसते पण निदान समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला अतिशय महत्त्वाचा आहे.
    भारतातील कामाच्या ठिकाणी असलेला तणाव किंवा तणावाचं वातावरण बदलण्यासाठी केंद्र पातळीवर विचार होणे गरजेचे आहे.

  3. लेखक थोरवे यांचा मानसिक आरोग्यावरील लेख वाचनीय आहे
    .

  4. मानसिक आरोग्याची आजच्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका अत्यंत सुंदर पध्दतीने शब्दबध्द केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pratibha Saraph on नव वर्ष ..
आशी नाईक on कवी
विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !