ऊन सावलीचे
नवीन उखाणे
झेल पदरात
पावसाचे गाणे
सरीवर सर
हातावर धर
ओल्या थेंब खुणा
जपते अधर
गाठ पदराला
जुन्या आठवणी
तुझ्या माझ्या मनी
निरोपाची गाणी
मुक झाला झुला
सरला श्रावण
माघारीण बाई
उरे आठवण
— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800