आपल्या न्यूज स्टोरी टुडे च्या पुणे येथील स्नेह मिलन, वर्षपूर्ती, प्रा डॉ किरण ठाकूर सरांची साजरी करण्यात आलेली ७५ वी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या बद्दल आणि विशेषतः आपल्या युनायटेड किंगडम मधील लेखिका सौ लीना फाटक यांनी त्यांच्याकडे स्नेह मिलनाचं दिलेलं दिलखुलास आमंत्रण, या बद्दल त्यांचे आणि आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे…..
१) हे संमेलन झाल्याचं मला सुनंदा पानसे कडून कळलं. खुपच लांब असल्याने सहभाग घेतां आला नाही याची हळहळ मात्र नक्कीच वाटली. संमेलनाची कल्पनाच अतिशय सुंदर. या जगावेगळ्या भुजबळ दांपत्यांना भेटण्याचा अलभ्य लाभ तुम्हा सर्वांना मिळाला. दोघांचे वाखाण्यासारखे गुण आहेत. त्यांचा उत्साह, समाजासाठी ते करत असलेल्या मेहनतीसाठी, त्यांना दिर्घायुष्य लाभो हि प्रभुचरणी प्रार्थना.
हे वेबपोर्टल एक वर्षाचे झाले. खुप खुप अभिनंदन. तसंच श्री किरण ठाकूर यांनाहि ७५व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभकामना.
पोर्टलवरच्या सर्व लेखक, कवींच्या नावाला फोटोंमुळे चेहरा मिळाला. त्यासाठी धन्यवाद. हा उपक्रम असाच चालू राहो हि सदिच्छा.
मग, आता यु.के. ला कधी येताय ?🏃♂️🏃♀️ सर्वांचे स्वागत आहे.
– सौ लीना फाटक. यु.के.
२) अलका स्नेहमिलन कार्यक्रम, घरीच करण्याची तूझी कल्पना मला खूप आवडली. मला आपल्या त्या दिवसांची आठवण झाली. आपण संगमनेरला खूप धमाल केली होती. तूझे आदरातिथ्य मी अनुभवले आहे. अलका, तुझे आणि देवेनचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. सामाजिक कार्यात तूम्ही छान गुंतवून घेतले आहे.
– प्रीती परदेशी. मुंबई
३) फारच छान स्नेह मिलन साजरे झाले. मी पुण्यात असतो तर ह्या स्नेह संमेलनात सहभागी व्हायला निच्छित आवडले असतें. देवेंद्र सरांना, पुढील पुण्यातील कार्यक्रमांना मला बोलावणे शक्य असेल तर मलाही आमंत्रण मिळाल्यास मला आनंदाच होईल…
– श्रीकांत चव्हाण 🙏 पुणे.
४) खूप सुंदर स्नेहमिलन व त्याचे यथार्थ वर्णन ! सर्वांचे अभिप्राय वाचून, स्नेहमिलनाला उपस्थित राहता न आल्याची खंत वाटतेय.😢
– डॉ स्वाती दगडे. पुणे.
५) डाॅ. किरण ठाकूर, पुणे यांच्या घरी झालेल्या आपल्या पोर्टलच्या स्नेहमिलनाचा वृत्तांत वाचला.
पोर्टलचे पुण्यातील लेखक, कवी, कवयत्री अशाप्रकारे एकत्र येऊन त्यांचा परस्पर परिचय झाला हे वाचून फार आनंद वाटला.
– अरूणा मुल्हेरकर. अमेरिका.
६) पुणे स्नेह मिलन वृत्तान्त वाचला. खूप सुंदर झाल्याचे दिसून येतेच. सर्वांचे अभिप्रायही आहेत. मला मात्र येता आले नाही. पुन्हा केव्हातरी. हार्दिक अभिनंदन.💐💐
– ज्योत्स्ना तानवडे. कवयित्री, पुणे.
७) “असं झालं पुणे स्नेह मिलन” हा अनोखा उपक्रम पुण्यात जेष्ठ पत्रकार किरण ठाकूर सर यांचे नियोजनात संपन्न झाला, याबद्दल देवेन्द्रजी भुजबळ सर आणि अलकाजी यांच्या वैशिष्ट्यपुर्ण सन्कल्पनेला मनापासून धन्यवाद.
२७ मार्च रोजी किरण ठाकूर ह्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमिताने पुण्यात हा स्नेहमेळावा झाला. सध्याच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांना बोलण्याची फुरसत नाही. अशा अगदी व्यस्त वातावरणात देखील वेबपोर्टलचे स्नेहमेळावे गावोगावी घेण्याची तयारी भुजबळ सरांची आहे यावरुन त्यान्च्या सामाजिक जाणिवेचा आवाका किती व्यापक आहे हे दिसून येते.
या उपक्रमाला डॉ. विद्या डागा मॅडम यांनी भरतनाट्यम सादर करून सर्वच उपस्थितांना आनन्दी केले. न्युज स्टोरी टुडेने जगातील ७२ देशात मारलेली भरारी ही सर्वांनीच प्रशंसनीय ठरविली. या ७२ देशातील लेखक, कवि, साहित्यिक नियमित लेखण करीत आहेत. देवेन्द्रजींची माणसं जोडण्याची ही अद्भुत किमया सर्वांना आवडली.
प्रा.डॉ.ऊज्वला बर्वे, प्रा.डॉ .सतीश सिरसाठ, प्रा माटे, डॉ .विद्या डागा मॅडम, डॉ राणी खेडीकर, उद्योजक प्राची सोरटे, जेष्ठ पत्रकार चंद्रशेखर कारखानीस, कवयत्री पद्मजा नेसरीकर, सुनील कडूसकर, मन्जुषा किवडे, सुनंदा पानसे, अनुराधा आणि मेधा जोगदेव, ममता मुनगंटीवार, देवयानी ठाकूर, राधिका भान्डारकर, दिपाली दातार, नीताताई देशपांडे, प्रा. डॉ.नचिकेत ठाकूर, प्रा.मानसी ठाकूर, प्रशान्त थोरात या सर्वच मान्यवरांनी कार्यक्रम अनोखा, खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्याची भावना व्यक्त केली.
न्युज स्टोरी टूडेचा पहिला वर्धापन दिन छान झाला. मागिल जवळपास एका वर्षात न्युज स्टोरी टुडे ने देश आणि परदेशातील शेकडो नव्हे, हजारो वाचक जोडले असून अनेकांना लिहीण्याची प्रेरणा दिली आहे. हे वाचकांसमोर फार चांगले व्यासपीठ तयार झाले आहे अशी भावना व्यक्त झाली. कोणताही औपचारिक पणा न ठेवता सर्वांना घरगुती वाटावा एवढ्या मोकळ्या, आनन्दी वातावरणात हा उपक्रम संपन्न झाल्याचे उपस्थितांनी नमुद केले.
किरण ठाकूर सरांनी बोलताना सांगितले की, मोल्सवर्थच्या मराठी ईन्ग्रजी शब्दकोश यांचा पाच वर्षं अभ्यास करून एक पुस्तिका लिहिली. तसेच आँनलाईन पत्रकारिता या विषयावर प्रथमच पीएचडी केल्याचे सांगितले. जवळपास रसिक, लेखक, पत्रकार, मित्र, व्यवसायी अशा विविध स्तरांतील मान्यवरांचे योगदान लाभले. या धावपळीच्या जीवनात असे स्नेहमेळावे सतत आयोजित करून एकमेकांना आनन्द द्यावा यासाठी देवेंद्र भुजबळ सर आणि अलकाताई यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद …….
– माधव अटकोरे. जेष्ठ पत्रकार, नांदेड
८) सौ.अलका व देवेंद्र सर,
एवढा छान योग तुमच्या दोघांच्या भेटीचा होता पण मला लाभ घेता आला नाही.
खुप वाईट वाटलं !!
वृंदावन यात्रेला जाऊन आले नंतर तब्येत बरी नाही. त्यात नात काश्मीराची दहावीची परिक्षा चालू आहे.
परत योग आला तर नक्कीच येणार आहे.
स्नेहसंमेलन छान झाल्याचं वाचलं. ही चांगली संधी मला मिळाली नाही. खुप चुटपुट लागली आहे. पुन्हा योग आल्यास जरुर येण्याचा प्रयत्न करीन.
– सुरेखा तिवाटणे. कवयित्री, पुणे.
९) मी सर्व वाचले. छान असा पुणे येथे आयोजित प्रोग्राम झाला. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👌🏻👌🏻💐💐
– सुधाकर वाणी. नवी मुंबई.
१०) “असं झालं पुणे स्नेह मिलन” सचित्र असल्याने अधिक भावले. तुमच्या या उपक्रमामुळे वयोवृद्ध लोकांना ही किती आनंदित राहता येतं ते कळालं. सारीच सदरे छान आहेत. भुजबळ सर खूप खुप आभार ..
💐आशा ज्ञानेश्वर दळवी. फलटन, सातारा.🎊🎊
११) सर कार्यक्रम खूप सुंदर झाला. प्रत्यक्ष भेट दिल्यासारखे सगळे वर्णन आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी..💐💐💐💐 वाढदिवसाची कविता खूप सुंदर. 👌
वाचक लिहितात… वाचकाच्या मनातले पान सुंदर. 👌👌 धन्यवाद सर. 🙏😊
– विद्या जगताप. जेजुरी, पुणे.
१२) पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
💐👍👌🙏
– अनिल चाळके. बदलापूर
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800