विश्व मनाला हे कळते,
जे तळमळीतून कार्य होते,
मग तुमच्या जिंकण्यासाठी,
सारे जग जणू धाऊन येते,
केलेली निस्वार्थ जी सेवा,
ती अर्पून त्या विश्वदेवा,
त्याच्या हृदयातील ती दुवा,
तुमच्या कल्पना विस्तारते,
मग अधिक चांगली होई कृती,
बघ सोबती तुज सहज मिळती,
घेतले कार्य त्यातही येई गती,
ती शिव शक्ती, तुजला, बळ देते..!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800