मार्च महिना आला की जागतिक महिला दिनाचे वारे सगळीकडे वाहू लागतात. महिलांमध्ये खुप उत्साहाचे वातावरण असते. तसे तर 365 दिवस हे महिलांचेच असतात ! तरी 8 मार्च हा जागतिक महिला दिन असल्याने ऑफिसमध्ये, सोसायटीमध्ये, महिला मंडळामध्ये, कॉलेजमध्ये तसेच मैत्रिणीच्या ग्रुप मध्ये महिला दिन साजरा होतो.
नवी मुंबईतील सानपाडा येथील मिलेनियम टॉवर्समध्ये सुध्दा मिलेनियम सह्याद्री क्वीन्स च्या ग्रुप ने सालाबाद प्रमाणे नुकताच महिला दिन जोशात साजरा करण्यात आला.
प्रथम सकाळी सर्व महिलांनी प्रभात फेरी आयोजित केली आणि नंतर खुर्चीवर बसून करण्याचे योगा प्रकार, योगाचे महत्व, आणि प्रात्यक्षिक दाखवले गेले. उपस्थित सर्व महिलांनी खुर्ची वरील योगाच्या प्रकारांचा लाभ घेतला.
सायंकाळी 06.00 ते 08.30 या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला सर्व महिलांना गंध आणि अक्षता लावून सोबत चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी विविध गेम्स चे आयोजन करण्यात आले होते. सर्व महिलांनी उस्फुर्तपणे या गेम्स चा आनंद घेतला. तसेच कविता, कराओके गाणी, सोलो डान्स, आणि ग्रुप डान्सचा आनंद लुटला.
विशेष म्हणजे, ग्रुप डान्स मध्ये नऊवारी साडीमध्ये विविध आसनांचे प्रकार ह्या एका आगळ्या वेगळ्या डान्स प्रकाराने उपस्थितांना आसनाचे महत्व पटवून दिले.
तर दुसऱ्या ग्रुप डान्स मध्ये ‘बाईपण भारी देवा’ या गाण्यावर केलेल्या भारी डान्स ने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी लकी ड्रॉ चे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. सोसायटीतील वयोवृद्ध महिलांतर्फे लकी ड्रॉ ची सोडत काढण्यात आली.
ज्या महिलांनी, महिला दिना निमित्त देणगी दिली होती त्यांच्या हस्ते केक कापून सर्व महिलांचा आनंद द्विगुणित केला.
रात्री जेवण आणि कुल्फी ने महिला दिनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
— लेखन : सौ.अलका भुजबळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मिलिनियम चार महिला दिन खुप खुप मस्त
खुप छान साजरा केला 👌👌👌👍👍👍👍👍💃💃💃💃💃💃
Wow very nice celebration …. alka you are just great
Wow very nice celebration