लेखिका मेघना साने यांना त्यांच्या ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकासाठी मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात प्रसिद्ध लेखक डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक व अध्यक्षा नमिता कीर उपस्थित होत्या.
या पुस्तकास याच वर्षी मुक्त सृजन साहित्य पत्रिके’चा संकीर्ण विभागातील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, ‘शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन’ चा ‘तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ मिळाले असून आता ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा विशेष पुरस्कार असे तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने एक वेगळीच हॅटट्रिक झाली आहे.
पुस्तक परिचय
परदेशात स्थापन झालेल्या मराठी शाळा, त्यांच्या अभ्यासक्रमाची निर्मिती, तिथे शिकवले जाणारे विषय, मराठी शिक्षणाचे तेथे असलेले महत्त्व याचा अभ्यास करून मेघना साने यांनी ‘मराठी सातासमुद्रापार‘ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला अनुराधा नेरूरकर यांनी प्रस्तावना लिहीली आहे. सतीश भवसार यांनी मुखपृष्ठ केले आहे.
या पुस्तकातील बरेचसे लेख आधी न्यूज स्टोरी टुडे www.newsstorytoday.com या व ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या पोर्टलवर प्रकाशित झाले आहेत. हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केले आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे पोर्टलच्या सुरुवातीपासून लेखिका असलेल्या मेघना साने यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
Abhinandan myam
अभिनंदन मेघना ताई💐💐या पुस्तकाचं परीक्षण मी लिहिलंय