या नवीन वर्षी, संकल्प नवा करीन,
शरीर उत्तम राहो, व्यायाम, योग करीन,
मी फिरावयास जाईन, मी पोहणे शिकेन,
मी उत्तम ते खाईन, वजन कमी करेन,
वरील सारे सुरू होते, पंधरा दिवस टिकते,
मग कुरकुर सुरु होते, हे कसे जमेल ?
वेळच पुरत नाही, व्यायाम थकवतो,
मग खाणे जास्ती होते, मस्त मग झोपतो,
महिन्यात पुन्हा ते सुरू होते, जे आधी होते,
अगोदरचे रूटीन, तेच मला आवडते,
मग संकल्प कुठे जातो, येते आठवण का कधी ?
का हे सारे स्वप्नच होते, की क्षणांची समाधी ?
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800