Friday, October 18, 2024
Homeसाहित्यरित्या सांजवेळी

रित्या सांजवेळी

रित्या रित्या सांजवेळी
थवे येता आठवांचे
कंठ गहिवरून आले
चित्र उमटले सोबतीचे //१//

वाटे होणार आहे आता
सुर्यास्त निरस आयुष्याचा
स्वागतास येऊन उभा हा
काळ जीवनाच्या मावळतीचा //२//

पानगळ झालेलं आयुष्य
चराचर सृष्टीचाच नियम
पालवी कशी फुटणार
मनी दाटले भीती कायम //३//

वाट पाहून थकलेल्या
डोळ्यांत दाटलेले भाव
कधीतरी येशील परतून
घेशील मनाचा तू ठाव //४//

रित्या सांजवेळी वाटते
स्वप्नांची झालर लावून
प्रतिक्षेत तुझ्या उभी मी
येतो कंठ माझा दाटून //५//

परवीन कौसर

— रचना : परवीन कौसर. बेंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन