Friday, December 27, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात…. सदरात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणुका होऊन गेल्या आणि निकाल सुध्दा जाहीर झाले आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी युतीला प्रचंड बहुमत प्राप्त झाले आहे. आता आपण  वाट पहातोय आहे ती, मुख्यमंत्री कोण होणार याची. अर्थात आपल्या पोर्टल च्या दृष्टीने अभिमानास्पद बाब म्हणजे, रश्मी हेडे यांनी ज्यांची यश कथा लिहिली, असे श्री हेमंतजी रासने हे पुणे शहरातील कसबा मतदार संघातून बहुमताभावपूर्ण श्रद्धांजली !ने आमदार म्हणून निवडून आले आहेत.श्री हेमंतजी रासने यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.
आता गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे वाचू या.
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)


व्वा, शाहू व्वा…
शाहूचे अतिशय वास्तवदर्शी चित्रण.
शाहूचे व्यक्तिमत्व हे बहुरंगी, बहुढंगी व बहुआयामी (Multidimensional) आहे.  त्याच्यामध्ये कार्यकर्ता आहे, लेखक आहे, अधिकारी आहे, पत्रकार आहे, वक्ता आहे व असे
अनेक आयाम त्याच्यात आहेत.
त्याच्या कार्याला सलाम.
— विनोद माळाले. शाहू चे वर्गमित्र तथा
निवृत्त जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ.

शाहू चरित्र फार छान…
— कॅप्टन योगेश अभ्यंकर. पुणे

“व्वा,शाहू  व्वा”
फारच सुंदर….
— प्रभाकर सातपुते. नगर

डॉक्टर विजय पांढरीपांडे यांना मी  खात्री देऊ इच्छितो.
देवा, शंभूराजे मजल्यांची इमारत बांधताना अथवा रंगरंगोटी करायच्या वेळी अनेक बांबूच्या पराती (हल्ली लोखंडाच्या) बांधाव्या लागतात. नंतर ते सर्व दूर करतात. आजुबाजूचा परिसर स्वच्छ करून एक देखणी इमारत तुम्ही आम्ही बघून म्हणतो. व्वा  बस थोडा धीर धरा.
१९२५ साली ज्या अखंड हिंदुस्थान ची पुनःनिर्मितीचे स्वप्न बघून ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत आलेले संघाचे स्वयंसेवक ते पूर्णत्वाला नेतील.
सहा सप्टेंबर २०२५ संघ आपला शतक महोत्सव साजरा करेल. आबाल वृद्ध यांना माझी कळकळीची विनंती आहे.मोबाईल टीव्ही पासून दूर रहा. हा परकियांनी सोडलेला विषाणू आहे.
त्यांना भारत विश्व गुरू होऊ द्यायचा नाही. देवा मन मोकळे केले आहे. दृष्टी अधू झाली म्हणून भिंग घेऊन वाचन करून मन प्रसन्न ठेवत आहे.
— प्रकाश पळशीकर. पुणे

श्रेयस झरकर यांचे अभिनंदन.. त्यांच्या एक दोन व्हिडीओज बघितल्या.
गिरीशजींची इच्छा किती मनापासून झाली होती.
ते त्यांच्या फोटोवरून कशी सुफळ संपूर्ण झाली हे बघून आनंद झाला…
सध्या पालकत्व खूपच कठीण झालेले दिसते.. राणीजींचा लेख आशादायी चित्र दाखवीत असल्याने बरें वाटले.
कॅर्बीन कोव्ह …चा सुंदर प्रवास प्रकाशचित्रांसह अनुभवला… धन्यवाद.. प्रतिभाताई.
सुनील जींची कविता तळागाळात पोचून लोकांना मतदानाचे महत्त्व कळले तर खूपच छान होईल.
श्री शाहू यांना आमच्यातर्फे ही अभिनंदन .
प्रा डॉ पांढरी पांडे यांचा लेख वाचताना जाणवते की यातील शब्द आणि शब्द खरा आहे ..हिंदीत म्हणतात…चोर चोर मौसेरे भाई…तसेच आहे हे ..
राधिकाजींची आते बहीण मृणाल सर्व गुण संपन्न ,प्रामाणिक अशी आहे वाचून किती बरे वाटते आजकाल अगदी बोटांवर मोजण्या इतके असे लोक उरले आहेत..खरे आहे त्या आपले नाव सार्थ करीत आहेत…आणि अशा लोकांच्या सहवासाने राधिकाजींची जडणघडण झालीय हे त्या अधोरेखित छान करतात..
हेमंतजींची कविता छान.
— स्वाती वर्तक. मुंबई.

सानपाडा येथील वसाहती मधील केंद्र बघून मतदारांसह आम्हीही सुखावलो..
पूर्णिमाताईंनी दिलेली योग शिबिराची माहिती वाचून एक आगळीच शांती अनुभवण्याचा योग आला..ती छायाचित्रं, महाराजांनी ज्या गुहेत तपश्चर्या केली तेथे योग करून अभूतपूर्व शांतता अनुभवणे ..सर्व छान वाटले.
अनुराधाजींची कथा अतिशय भावपूर्ण, अंगावर शहारे आणणारी अशी आहे ..त्या काळच्या अलवणात राहणाऱ्या बाल विधवा स्त्रियांची स्थिती किती भयंकर होती हे मी पण जवळून बघितलंय… हृदयस्पर्शी कथा अनुराधाजी शपथ ..घेऊन किती जणांनी मतदान केले हे परवा कळेलच ..भिडे जी..कविता छान.
सावरकरांबद्दल आदर नसलेला , त्यांच्या हाल अपेष्टांबद्दल वाचून थरार न अनुभवणारा कोणी विरळाच असू शकतो.
विडिओ बघितला, ऐकले आपले विवेचन… मुद्देसूद, छान ,जेल बघण्यासाठी कळकळीने आवाहन करणारे असे आहे.
ग्वाल्हेर येथे सावरकरांना बोलावून त्यांचा सन्मान करणारे. माझे वडील प्रथम सावरकरांच्या पुस्तकात उल्लेख आढळतो 🙏
— स्वाती वर्तक. मुंबई

मतदान करणाऱ्यावर सक्ती करणारे सरकार निवडणुकीत जिंकणार नाहीं.
— निरंजन राऊत. विरार
१०
सर्वच लेख वाचले. छान व उद्बोधक आहेत.अर्थात् प्रत्येकाची रुची भिन्न असते.पण मला आवडले.त्यापैकी “आणि मतदार सुखावले”हा लेख दखल घेऊन तशी कार्यवाही प्रत्येक सोसायटीने केल्यास सर्व सभासदांची खूपच चांगली सोय होईल आणि मतदानाचा टक्का देखील वाढण्यास मदत होईल.👍
— ब रा देशपांडे.
निवृत्त उपसचिव, मंत्रालय, मुंबई.
११
संजीवजींच्या लेखामुळे टेलिव्हिजन आणि सध्याची परिस्थिती वर छान उहापोह होतो. दूरदर्शनमुळे वाचन संस्कृती लयास गेली या दोषारोपावरून ते चर्चेमुळे पुस्तकांची विक्री वाढलीय ही एक आशादायी बाब.
माधुरी ताईचे लेख वाचनीय असतात .शरद जांभेकरांनी सुहासिनींना भेटायला सांगणे, अनोळखी वाटा..या सदराला यश मिळणे आणि या साऱ्याचे श्रेय त्यांनी पु वि बेहरे यांना देणे ..उत्तम.
मेघना साने यांचे मराठी साता समुद्रापार ..या पुस्तकासाठी हार्दिक अभिनंदन.
साहेबरावांची कविता सुन्न करणारी वाटली..खरेच ..काय दशा झालीय आपल्या पुढाऱ्याची…एकेक शब्द मनामध्ये नेत्यांविषयी चीड उत्पन्न करणारा वाटतो…आणि अगदी सहज साध्या सोप्या भाषेत लिहिलेली.
मदन लाठी ..का ..राठी ..कळले नाही..वेगवेगळ्या परिच्छेदात वेगवेगळे नाव असल्याने जरा गोंधळ होतो..आमचे ही त्यांना अभिनंदन कळवावे.
श्री सतीश चौधरी यांनी लिहिलेली कादंबरी ..जिना व दिना..या पुस्तकाचे परीक्षण आवडले.
लंडन वारी मध्ये लँडनब्रिज येणार नाही जरा अशक्य च..तसेच बर्किंगहम पॅलेस , तेथले आर्किटेक्चर याचे वर्णन आणि त्याला खुलवणारी छायाचित्र सुंदर..छान पल्लवीताई.
कमांडर ओक यांच्या अनुभवाच्या लेखणीतून सांगितलेले किस्से अजब गजब ..तसाच हा ..प्रॉव्हिडंट फंडाला आग लावा ..म्हणणारा आणि त्याला चाकोरी बाहेर जाऊन मदत करणारे ओक. सर…त्यासाठी मिळालेले लहानसे बक्षीस जपून ठेवलेले  पेन…अशा लहान लहान गोष्टीतून मिळालेला आनंद अवर्णनीय असतो.
प्रज्ञाताईंची गझल.. शांततेच्या खोल लहरीत त्यांचे मन रुळते..ही भावना आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई

माझी जडणघडण भाग २४ वरील अभिप्राय (ले. राधिका भांडारकर)

१.. आत्ताच मी तुमची ‘मृणाल’ वाचली.. व्यक्तिचित्रण कसे लिहावे ते तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे.. खूप छान !
— उज्वला सहस्त्रबुद्धे.  पुणे

राधिकाजींची आते बहीण मृणाल सर्व गुण संपन्न, प्रामाणिक अशी आहे, हे वाचून किती बरे वाटते. आजकाल अगदी बोटांवर मोजण्याइतके असे लोक उरले आहेत..खरे आहे त्या आपले नाव सार्थ करीत आहेत.आणि अशा लोकांच्या सहवासाने राधिकाजींची जडणघडण झालीय हे त्या अधोरेखित छान करतात..
— स्वाती वर्तक. मुंबई

कुमुद आत्या व मृणाल दोन्हीची आत्मवृत हृदयाला स्पर्श करणारी आहेत. आईचे अनेक गुण मृणाल मध्ये जन्मताच आले आहेत. दोघीही प्रेमळ शांत कुटूंबावर जीवापाड प्रेम करणार्या  स्वयंकात तरबेज नाती जपणार्या आहेत .दोघी त्या काळातल्या प्रतिनीधत्व करतात. कुमुद आत्या कुटूंबाचापाया तर मृणाल त्यावरील कळस .मृणालविषयी वाचताना सहज विचार आला कि तुम्ही दोघी एका वयाच्या ती सगळ्या हुशार तरबेज तेव्हा तुझ्या मनांत तिच्या विषयी हेवा मत्सर वाटला नाही? आदरयुक्त प्रेम कौतुक वाटत पण तिच्यापेक्षा आपण कुठतरी कमी आहोत ही भावना मनात नाहीं आली ? स्पष्टपणे विचारल म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. मला जे वाटल ते लिहल. दोन्ही पात्र डोळ्यासमोर ऊभी राहतात .यातच तुझ्या लेखनाची खुबी आहे. लिहीत राहा. अनेक शुभेच्छा 💐
— रेखा राव. मुंबई

👍सुंदर 👌👌
— नंदिनी चांदवले. पुणे

मा. राधिकाताई,
आपला *मृणाल* हा व्यक्तिमत्व व्यक्ततेचा लेख वाचला. आपली आतेबहीण. आपल्या पेक्षा लहान. तिच्यातील श्रेष्ठत्व आपण व्यक्त केले. आपणास कणिक भिजवता येत नाही, आणि ती गोल पोळ्या करू शकते. अनेक बाबतीत ती आपल्या पेक्षा सरस आहे.
लेखनातील हा प्रामाणिकपणा लेखन दर्जा उंचावतो. एक चांगला लेख वाचावयास मिळाला.
आपले लेखन, काव्य हे उत्कृष्ट दर्जाचेच असते. त्यातील एकटाकीपणा चिरंतन रहावा या साठी आपल्या लेखन कलेस वासंतिक शुभेच्छा.
— अरुण पुराणिक. पुणे

या आणि आधीच्याही लेखांत तुझ्या मनावर कोरल्या  गेलेल्या अनेकांविषयीच्या भावनिक प्रतिबिंबांची चांगल्या पद्धतीने, ओघवती भाषेत  मांडणी केली आहेस.  तुझे लिखाण  / लेख मनःस्पर्शी  असतात.
या लेखात  माझी मला नव्याने ओळख  करून  दिल्याबद्दल अभिनंदन आणि आभारही.
माझ्याविषयी मी सुद्धा इतका विचार  कधी केला नव्हता आणि कोणी करत असेल  असेही मला वाटले नव्हते.
तुझ्या मनातील भावनांना शब्दांमधे  गुंफून त्या सर्वांपर्यंत  पोहोचविण्याच्या तुझ्या प्रयत्नांचे मनःपूर्वक  अभिनंदन .
माझ्या व्यक्तिमत्त्वात  इतकी भावनिक  छटांची मोरपीसे खोचून ते रंगीबेरंगी, इंद्रधनुषी केल्याबद्दल  आभारी आहे.
पुनश्च  अभिनंदन आणि अनेक धन्यवाद.
— मृणालिनी बापट. ठाणे (प्रत्यक्ष लेखाची नायिका)

राधिका, क्रमशःलिखाणातील हे पान ही उत्तम सजले आहे !
खूप सुंदर, हुबेहूब वर्णन मृणालचे ! अशीच आहे मृणाल.
— आरती नचनानी. ठाणे

अप्रतिम, असं आदर्श व्यक्तिमत्व, मोजक्या व नेमक्या  शब्दात उलगडले आहे. तिच्या आयूष्याच्या वाटेवरच्या काट्यांचा उल्लेख ही न करता त्याची बोच जाणवली हे आपल्या लेखनाचे कसब.
— अंजोर चाफेकफ. मुंबई

जशी आहे तशी मृणाल तू तुझ्या प्रभावी लेखनशैलीत उभी केलीस. सलाम तुझ्या लेखणीला !
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
१०
राधिकाताईंनी शब्दांकित केलेलं मृणालचं व्यक्तिमत्त्व मनाला हळुवार स्पर्श करणारं, नाटकीपणाचा लवलेश नसलेलं आणि तिच्यावर आलेल्या प्रसंगातून उलगडणारं आहे. मृणालला मी ब-यापैकी ओळखत असल्यामुळे राधिकाताईंची गुणग्राहकता, सच्चेपणा प्रकर्षाने जाणवला. लेखनशैलीचं सौंदर्य  इतकं पदोपदी जाणवतं कि ओझरता उल्लेखसुद्धा करणं कठीण.
— साधना नाचणे. ठाणे
११
हॅटस् ॲाफ यू ताई,
काय जबरदस्त शब्दांकन आहे हो मृणालचे …..
काही व्यक्तिंच्या नशिबी कर्तृत्व असूनही मृणाल किंवा लता मंगेशकर बनणं येतं…
त्या कुटुंबाच्या जीवन यज्ञात स्वत:ला झोकून देतात, समिधा बनून
जळतात व इतरांना सुगंध देत राहतात.
आपली इच्छा असली तरी आपण मृणाल होऊ शकत नाही. प्रत्येकाचे भागध्येय वेगळे असते.
— मा. सुमती पवार. नाशिक
१२
” Mrunal ” I liked very much. She was very clever I know that but in her future she was so Great ,I was not knowing.Really great she is.🙏🙏
— सुषमा पालकर. पुणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आत्या आणि मृणाल यांचा व्यक्तिचित्र अगदी योग्य शब्दात मांडलेल आहे. वाचणाऱ्यालाही त्यांच्याबद्दल मनामध्ये आदर निर्माण होतो आणि स्वतःला लढा देण्याची हिंमत वाढते. बारीक-सारीक प्रसंग आणि त्याचे मनावर होणारें परिणाम आणि प्रसंग बघून मनाला आवर घालण्याची आणि सगळं सांभाळून घेण्याची वृत्ती ही ॲडजस्टमेंट सहजी शक्य नसते ती मृणालच्या बाबतीत सहजपणे तुम्ही चितारली आहे.
    संपर्कात आलेल्या व्यक्ती नातेवाईक शिक्षक या सगळ्यांच्या व्यक्तिरेखा आणि तुमच्या मनातील त्यांच्याबद्दलच्या संकुचित नसलेल्या भावना यात तुमच्या मनाचा लहानपणापासूनचा मोठेपणा आणि कौतुक करण्याची वृत्ती, चांगलं असेल ते बोलून दाखवलं पाहिजे आणि ते लिहिले गेलेच पाहिजे ही भावना कौतुकास्पदच आहे.
    तानसेन असण्यापेक्षा कानासेन आहोत या समृद्ध विचाराने गाणं न म्हणता येणे यावर मात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९