नमस्कार मंडळी.
बोलता बोलता नव्या वर्षाचा पहिला आठवडा होऊन ही गेला आणि हळू हळू मागच्या वर्षा सारखेच हे वर्ष वाटू लागले आहे. शेवटी निसर्ग, त्याच्या त्याच्या नियमाने चालतो तर माणसाने सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष अशी काल गणना सुरू केली आहे. म्हणूनच अशी काल गणना न करता आपला प्रत्येक क्षण कृतिशील राहील, आनंदात जाईल, यासाठी प्रयत्नशील राहू या. असो…
आता पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
या आपल्या पोर्टल चे नियमित लेखक, मार्गदर्शक, हित चिंतक प्रा डॉ किरण ठाकूर सर यांच्यावर मी लिहिलेल्या “सर गेले, आठवणी राहिल्या..” या गौरवपर लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१
डॉ.किरण ठाकूर सर नसतांना ऐंशीच्या दशकात माझे एक चांगले मित्र, सुहृद व मार्गदर्शक गुरुच होते. मी पुण्यात जिल्हा माहिती अधिकारी व ते UNI या न्यूजब्युरोचे प्रमुख होते. दोघेही नासिककर असल्याने वृत्त वार्ता क्षेत्रात आमची उल्लेखनीय देवाणघेवाण असायची.पुढे तर कौटुंबिक संबंध स्थीर झाले.. अनेकदा हास्यविनोदांत आम्ही सहभागी असायचो. त्यांचे कार्यालय व निवास सदाशिव पेठेत होते. नंतर ते पत्रकार वसाहतीत रहावयास गेले. तेथेही मी नित्यनेमाने गप्पा मारण्यासाठी जात असे. मुलं लहान होती.जवळपास दहा वर्षे किरणजींचा सहवास मला लाभला. एक उत्तम मार्ग दर्शक मित्र म्हणून त्यांचे सतत सहकार्य असायचे.माझी बदली झाल्यावर माझ्या गॅलरीत असलेल्या दहा उत्तमोत्तम फुलांच्या कुंड्या मी त्यांना भेट दिल्याचे आठवते ते मुळातच निसर्गप्रेमी होते. इंग्रजीभाषेवर त्यांचे असाधारण प्रभृत्व होते माध्यम क्षेत्रातील किरणजी म्हणजे एक चालताबोलता संदर्भ ग्रंथच असे आम्ही पत्रकारिता शिकत असतांना ते व्हिजीटिंग व्याख्याते होते त्यांचे व्याख्यान सर्वच रसिकतेने ऐकत.. मुंबईत माहिती संचालक असतांना पुणे येथे कामानिमित्त प्रत्येक वेळी मी त्यांची घरी किंवा ते संचालक प्राचार्य असतांनाच गोखले इन्स्टिट्यूटमधील कार्यालयात आवर्जून भेट घेत होतोच. एक जिव्हाळ्याचा कौटुंबिक स्नेहापोटी या भेटी असत. एक सहृदय मित्र मार्गदर्शक गुरू गमवल्याचे मला अत्यंत दु:ख झाले.त्यांच्या विचारा आणि श्रद्धेनुसार त्यांनी देहदान केले. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. (देवेंद्रजी, आपला लेख मला खुपचं भावला. किरणजी संबंधी अनेक हृद्य आठवणी त्यामुळे जाग्या झाल्या. त्यांच्या कुटुंबीय दु:खात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.ही प्रार्थना.)
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नासिक
२
सरांबद्दल वाचून खूप बरे वाटले.खरेच पूर्वीचे शिक्षक किती शांत, निर्मल, तत्वनिष्ठ असत. तुम्ही त्यांना मराठीत लिहीते केले या साठी आभार.
— स्वाती वर्तक. मुंबई
३
डॉ. किरण ठाकूर यांच्या अनमोल व्यक्तीमत्त्वाचे दर्शन मा. संपादक देवेंद्र भुजबळ यांच्या लेखातून झाले.
डॉ. किरण ठाकूर यांच्या पत्रकारितेला आदरपूर्वक सलाम करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते.🙏🙏💐
— राधिका भांडारकर. पुणे
४
मी ही प्रा डॉ किरण ठाकूर सरांचा पत्रकारितेतील विद्यार्थी आहे. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— शाहीर हेमंत मावळे. पुणे
सौ रश्मी हेडे सातारा यांनी लिहिलेल्या ‘वाढ’दिवस’ या कथेवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
१
खूप छान कथा.
दुसऱ्यांसाठी पण जगता आले पाहिजे.
— सौ अर्चना तिवाटने. वडूज
२
खुप छान रश्मी वहिनी अप्रतिम कथा 👌👌
— स्मिता विवेक पातुरकर. वाई
३
मन हेलावून टाकणारी कथा खूप छान .
— गीता अक्षय सगरे. कराड
४
छान कथा
— मनीषा पाटील.
५
खूप सुंदर कथा
— संजीवनी वेळापुरे. रेहमतपुर.
६
खूप सुंदर कथा.
— रेवती मोहिरे. कराड
७
चौकोनी कुटुंबाची सुंदर कथा.
— मीनाक्षी पालकर.
८
छान
— सौ नेहा नितीन लोखंडे. कराड
९
खूप छान कथा रश्मी.
— सौ ज्योती तुषार कासार. सातारा
१०
रश्मी ताई तुम्ही लिहिलेली “वाढदिवस ” हि कथा मनाला खुप भावली.👌👌👍
— सो.सुरेखा टाकसाळे. कराड
११
पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लावणारी कथा रश्मी, सुंदर.
— सौ राणी प्रकाश मांजरकर. सातारा
खूपच सुंदर देवेंद्र भुजबळ यांच्यावरचा.👌👌👌इतरही 👌👌👌👌
माझी एडिटोरियल अरेस्ट एकदम मस्त👌👌👌 खुसखुशीत, विनोदी अशा स्वरूपाचा लेख.डोळ्यासमोर अगदी घडतंय असं वाटलं.मस्तच आणि अलका तुझ्या केलेल्या कौतुकाबद्दल खूप भारी वाटलं.🎊👌👌👌👌
— नीता देशपांडे. पुणे
माझी जडण घडण भाग ३० वर प्राप्त झालेले अभिप्राय…..
१
” वाचन” सुंदर लिहिले आहे.
वाचनामधे काय काय वाचू शकतो,वयानुरुप वाचन कसे बदलत जाते, वाचनाच्या सर्व अंगांचा छान आढावा घेतला आहे. राधिकाताई, तुम्ही खरेच वाचन, अनुरूप शब्द या सर्वांचे ” भांडारकर “आहात. खूप शोभून दिसत आहात तुम्ही.👌👌
— छायाताई मठकर. पुणे
२
अतिशय सुरेख विचार!
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
३
खूप छान, वाचनाचा प्रवास …
— सुमतीताई पवार. नाशिक
४
तुझा पत्रिका लेख वाचला आणि मनात अनेक आठवणींचे मोहळ ऊठले.
तुझी लेखणीच तशी पॅावरफूल आहे. सगळे प्रसंग घटना डोळ्यापूढे ऊभ्या राहतात. माझ्या सासर्यांना ज्योतीष शासत्रात खूप रस होता.त्यांनी त्याचा अभ्यासही केला होता. लहानपणापासून माझ्या मिस्टरानी पाहिल्यामुळे त्यानाही इंटरेस्ट निर्माण झाला व ते ही कुंडलीची मेळामेळी, ग्रहांचे परिणाम यावर पुस्तक वाचून विचार विनीमय करून कुंडली पाहू लागले .त्यातूनच माझे लग्न ठरले. कुठून तरी माझी कुंडली मिळाली.ओळख नसताना मागणी घालून निरोप पाठविला. अनोळखी कर्नाटतकातली फॅमिली म्हणून प्रतीसाद दिला नाहीं. तरी परत परत निरोप पाठवून वर्षभर वाट पाहून अखेर आम्ही होकार दिला.
देवाच्या कृपेने आज आम्ही खूप सुखसमाधानात आहोत . गेल्या महिन्यात १४ नोव्हेंबरला लग्नाला ५७ वर्षे पूर्ण झाली .केवळ कुंडली पाहून .😀
— रेखा राव. मुंबई
५
राधिकाताईंनी वाचकांशी सहज सुसंवाद साधण्याच्या त्यांच्या शैलीत वाचनाचं महत्त्व ‘कल्पनाशक्ती, ज्ञान आणि शब्दसंग्रह आणि ज्ञान उन्नत करण्याचं एकमेव माध्यम’, ‘माहिती आणि ज्ञानाचा स्रोत’ अशा समर्पक शब्दात सांगितलंच आहे. पण वयाप्रमाणे बदलत जाणा-या ‘आवडी’ आणि त्याप्रमाणे ‘ओळख’ झालेल्या, ‘अनुभवसमृद्ध’ करणा-या पुस्तकांची रंजक यादी देऊन वाचकांशी जवळीक साधली आहे. नाणावलेल्या लेखक- कवींनी दिलेलं विचारधन अनमोल, अनंत आणि अफाट आहे हे आपल्या खास शैलीत सोदाहरण सांगून लोकांना वाचनासाठी प्रवृत्त केले आहे. पूर्वापार चालत आलेल्या वाङ्मय प्रकारांचा उल्लेख करताना डिजिटल वाङ्मयाचा उल्लेखही आवर्जून केला आहे. वाचन माणसाचं व्यक्तिमत्त्व घडवतं. तसंच जाहिराती, पाट्या, बाल वाङ्मय, त्यातील छोटे नायक- नायिका आणि आपलं शैशव अबाधित ठेवण्यातलं त्यांचं योगदान हे विचार स्वागतार्ह वाटले. स्वत:कडे ‘झोपलेली चिउताई’ म्हणून बघणं, वाचनातून मिळालेल्या ‘विचारधना’ला आत्म्याचा भाग मानणं हे विचारच राधिकाताईंची ‘जडण-घडण’ लक्षणीय करतात.
— साधना नाचणे. ठाणे
अन्य प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१
आपला अंक वाचला.हरीभाऊ विश्वनाथ यांच्या शतकोत्तर कार्यक्रम वाचला छान. हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.🌹🙏
— नंदकुमार रोपलेकर. जेष्ठ पत्रकार, मुंबई
२
अ.भा.वरिष्ठ नागरिक संघाच्या २४ व्या वर्षाचे प्रमुख पाहुणे म्हणून माध्यम सम्राट श्री देवेंद्र भुजबळ यांनी जेष्ठ नागरिकासंबंधी केलेले भाषण मनापासून आवडले. देवेंद्र आणि या संघास हार्दिक शुभेच्छा
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
४
ज्येष्ठ नागरिकांविषयी आपण व्यक्त केलेल्या विचारांवर मी माझी सहमती पोस्ट केली आहे.
— प्रा. डाॅ. सतीश शिरसाठ.
५
प्रसाद मोकाशी, सुनील चिटणीस, बबन आराख आणि ठाणगेजींनी नवीन वर्षाचे सुंदर स्वागत केले आहे..
सुनीलजींची कविता अतिशय भावपूर्ण आहे. खरेच आहे, तीच सकाळ तीच संध्याकाळ..
काय आले, काय गेले कोणास फरक पडतो ?
— स्वाती वर्तक. मुंबई
५
एका अवलिया विषयी इतकी सविस्तर माहिती देणारा लेख लिहिणे हे सुद्धा खूपच कौतुकास्पद आहे. त्यासाठी प्रथम दिलीप गडकरी सरांचे हार्दिक अभिनंदन. “सैली” पुस्तकाच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखात श्रीकांत सिनकर ह्यांच्या संपूर्ण साहित्यिक प्रवासाची आणि थोड्या प्रमाणात वैयक्तिक जीवनाची माहिती मिळते. लेख खूपच छान आहे. मनःपूर्वक धन्यवाद दिलीपजी.
— सौ मृदुला राजे. जमशेदपूर
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800