जन्मोत्सव गुरूमाऊलीचा
पौर्णिमेच्या मुहूर्ताचा
गुरूचरित्र पारायणाचा
दत्तयाग हवनाचा
निर्गुणाची अनुभूती
त्रिगुणाची महती
ब्रह्मा विष्णू महेश
सरूप त्रिमूर्ती
उत्पत्ती संवर्धन लय
विश्वाची निर्मिती
सत्व रज तम
गुणांची शाश्वती
एकच तू आधार
सांगे जीवनाचे सार
मार्गदर्शक थोर
सहज भवसागर पार
मुखी दत्त नाम
अवधूत चिंतन
चित्ती दत्त धाम
सुख चिरंतन.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
वल्लभ दिगंबरा
नमन दत्तात्रेयांना शुभेच्छा तुम्हाला.
— रचना : मीरा जोशी
— संपादन : सौ अलका भुजबळ. 9869484800
श्री दत्त ही रचना भावली