Thursday, September 18, 2025

संगीत

आज आपल्या पोर्टल वर प्रथमतः श्रद्धा जोशी यांची कविता प्रसिद्ध होत आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.

अल्प परिचय :-

श्रद्धा जोशी यांना त्या महाविद्यालयात असताना आपण थोडेफार लिहू शकतो याची जाणीव त्यांचे सर, प्रा.रमेश तेंडुलकर (क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे वडील) यांच्यामुळे झाली. त्यानंतर विविध मासिके, वर्तमानपत्रांतून त्यांनी लेखन केले. पण विवाहानंतर लेखनात प्रापंचिक अडचणींमुळे खंड पडला. आता थोडी मोकळीक मिळाल्यानंतर पुन्हा त्यांनी जोमाने लेखनास सुरुवात केली असून प्रादेशिक,राज्य तसेच राष्ट्रीय स्तरांवरील ऑनलाईन समुहातून विविध स्पर्धांमधून सहभाग घेतला आहे. काव्य, कथा, पत्रलेखन, ललित लेखन, अलक इ. लेखनप्रकारात त्या लेखन करतात. स्पर्धांमधून सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ अशी अनेक सन्मानपत्रे तसेच स्मृति चिन्हे त्यांना मिळाली आहेत.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

असे संगीत उपचार
मरगळलेल्या मनाचा
धून संगीताची ऐकता
पळतो थकवा तनाचा -१

हृदयाच्या उपचारार्थ
म्हणा ‘विठ्ठल’ नादमय
असे सातत्याने म्हणता
सशक्त होतसे हृदय -२

स्वर दुरून बासरीचे
पडताच आपल्या कानी
गोळा होऊनी अवयव
अवघे मन वृंदावनी -३

पिके संगीत ऐकताच
बहरून येती अमाप
ओटीत धन्याच्या टाकती
भरभरून धान्य माप -४

गोदोहन ते करताना
लावताच मंद संगीत
कल्पनातीत देती दूध
गाई होऊन आनंदीत -५

अवघा निसर्ग संगीत
हवेत ऐकण्यास कान
तनमन अवघे एक
ऐकताच निसर्ग तान -६

— रचना : श्रद्धा जोशी. डोंबिवली
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. श्रद्धाताई, कविता छान आहे. संगीताचे ज्ञान नाही पण जाण निश्चित आहे.

  2. कविता मनाला भावते आहे… निसर्गाचे आणि संगीताचे नाते किती अतूट आहे हे जाणवते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा