गं सदाफुली, सदाफुली
निसर्गाच्या सुंदर मुली
किती नाजुक ती पाकली
फांदी ती फुलांनी भरली
मला आवडते सानुली
गं सदाफुली, सदाफुली
रोज सदाफुली वेचते
फुले देवाला मी वाहते
छकुली पानात हासली
गं सदाफुली, सदाफुली
सदाफुली सदा फुलते
झकास वा-यात नाचते
आज ती मजशी बोलली
गं सदाफुली, सदाफुली
मी तिला प्रेमाने जपते
सुख दु:ख मला सांगते
मैत्रीण माझी ही चांगली
गं सदाफुली, सदाफुली
— रचना : गज आनन म्हात्रे. करावेगाव, नवी मुंबई.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Congratulations sir,
Congratulations Sir