Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यहिरवा ऋतू

हिरवा ऋतू

तरु तहानले पाऊस पाण्याला,
टप टप बरस पाऊस धारा,
धरती-पर्जन्याची भेट होऊ दे आता,
गंध मातीचा पसरु दे नवा कोरा //१//

बेफाम वावटळ उधाण वाऱ्याला,
मातीचा लोट फिरतो भोवऱ्यापरी,
पक्षी दडाले घरट्यात धुरळा पाहूनि,
दाटले नभी काळे घन रजनीपरी //२//

आला – आला पावसाळा, हिरव्या ऋतूचा,
टपोऱ्या थेंबात चिंब झाली वसुंधरा,
ओहळ धावले घेवूनी लाल मातीला,
मयूर हर्षला पसरूनी पिसारा //३//

तप्त धरती सुखावली गारव्यात,
मंजुळ स्वरात कोकिळेने धरली तान,
फड फड पंखातून उडाले तुषार,
ओघळत्या थेंबात मोहक हिरवेगार पान //४//

अर्थमंत्री तू खरा भारताचा,
दैव परीक्षेत घडतो बळीराजा,
थेंब मूल्यात जपू, राष्ट्रीय ध्यास,
सृष्टीचा करविता, तूच वरुण राजा //५//

वर्षा भाबल.

रचना : सौ. वर्षा भाबल. नवी मुंबई
संपादन : देवेंद्र भुजबळ.
निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं