१
तो उगाळत राहिला, उगाळत राहिला ते झिजतच गेलं.
पण् , झिजताना तसूभरही सुगंध कमी केला नाही त्यानं.
त्याच सर्वांग चंदनाच्या सुगंधीत स्पर्शाने गंधाळून गेलं.
शीतलता घ्यायला तेवढीच विसरला.
—————-
२
फुंकर मारून झटकल्यावर धुळीचे कण क्षणात उडून गेले आरसा त्याचं रूप दाखवत होता.
मनातील धुळ तशीच साचलेली, तिला कोणतेही रामबाण उपाय लागू पडले नाहीत.
वेड मन….!!
—————-
३
भरगच्च भरलेल्या डोंगराच्या निळाईला, झाडांनी समर्पण दिले. ती दिमाखात एकामागोमाग उतरणीवर उभी राहिली.
पावसाची किमया नी, सदोदित सूर्यदेव किरणोत्सवाने प्रसन्न हा जादूही नजराणा बघायला सौंदर्य दृष्टी सदैव तत्पर राजी झालेली.
———————-
४
तो पूर्णतः खारा म्हणून त्याने वाहवा मिळविली होती, पण त्याला खार करताना योगदान मात्र त्यांनी दिलं.
तो अथांग समुद्र झाला आणि आपल्यातील गोडवा विसरत त्या नद्या होऊन त्यात विलीन होत गेल्या. खरं समर्पण नी ऋण त्यांचंच….!!
——————–
५
सुगंधी अत्तराच्या फवाऱ्याने त्याचा कपडा सुगंधीत झाला म्हणून तो खूष.
अन् , त्याचा मित्र मात्र वेगळीच गोष्ट सांगत होता.
आयुष्यभर त्याचा तो तिसरा मित्र समाजासाठी काहीतरी काम करता आला आज त्याचा देह अत्तरापेक्षाही सुगंधीत झाला होता म्हणून हा खूष.
— लेखन : सौ माधवी प्रसाद ढवळे. राजापूर, जिल्हा रत्नागिरी
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
माधवी ताई, सर्व अलक रचना छान आहेत.